वॉटर हिटर धुळीने 'गोठले', विद्यार्थी थंड पाण्याने गारठले

वॉटर हिटर धुळीने 'गोठले', विद्यार्थी थंड पाण्याने गारठले

  • Share this:

nandurbar325 डिसेंबर : कोट्यवधी रुपये खर्चुन शासकीय आश्रमशाळांमध्ये बसविण्यात आलेल्या सोलर वॉटर हिटर सिस्टिम धूळखात पडुन असल्याने ऐन कडाक्याच्या थंडीत आदिवासी विद्यार्थ्यांना नदीवरच थंड पाण्याने आंघोळ करावी लागत असल्याचं चित्रसमोर आलंय.

नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार आणि तळोदा प्रकल्पाच्या जवळपास 40 हुन अधिक आश्रमशाळांमधील या सोलर वॉटर हिटर सिस्टीम बंद आहेत. मुळातच फक्त ठेकेदाराचे हित ध्यानात घेवून बसविण्यात आलेल्या या सोलर वॉटर हिटर सिस्टीम मधून गेल्या एक दोन वर्षात एक बादलीही गरम पाणी मिळाली नसल्याची विद्यार्थ्यांची तक्रार आहे. तर दुसरीकडे ज्या शाळांमध्ये पाण्याचे श्रोतच नाही, पाण्याची कमतरता आहे अशा आश्रमशाळांमध्येही फक्त कमीशन पोटीच या कोट्यवधींच्या सोलर वॉटर हिटर सिस्टीम बसवण्यात आल्याच चित्र दिसून येत आहे. मात्र अधिकारी आणि ठेकेदारांच्या या खाबुगिरीचा फटका विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थीनींना खास करुन बसत असून त्यांना कडाक्याच्या थंडीतच उघड्यावर स्नानासाठी जाव लागत आहे.

 

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 25, 2014 03:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading