तावडे मुंबईचे,बापट पुण्याचे तर शिंदे ठाण्याचे पालकमंत्री ?

तावडे मुंबईचे,बापट पुण्याचे तर शिंदे ठाण्याचे पालकमंत्री ?

  • Share this:

vinod_tawade_shinde24 डिसेंबर : भाजप आणि शिवसेना सरकार आता गुण्यागोविंदाने कामाला लागले आहे. मंत्रिमंडळाच्या खातेवाटपानंतर आता युतीच्या मंत्र्यांवर पालकमंत्र्यांची जबाबदारी सोपवण्यात येणार आहे. नव्या पालकमंत्र्यांची लवकरच घोषणा होणार आहे. त्याची संभाव्य यादी आयबीएन लोकमतच्या हाती आली आहे.

शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या मुंबईचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी सोपवण्यात येणार आहे. तर मुंबई उपनगरची जबाबदारी सुभाष देसाई यांच्यावर सोपावून युतीचा धर्म पाळला जाणार आहे.

तर ठाण्यात एकनाथ शिंदे पालकमंत्री होतील. पुण्यात गिरीष बापट यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात येणार आहे. ज्या त्या जिल्ह्यातून असलेल्या नेत्यांना पालकमंत्र्यांची जबाबदारी सोपवण्यात आलीये.

पालकमंत्र्यांची संभाव्य यादी

मुंबई - विनोद तावडे

मुंबई उपनगर - सुभाष देसाई

पुणे - गिरीष बापट

ठाणे - एकनाथ शिंदे

नाशिक - गिरीष महाजन

जळगाव - एकनाथ खडसे

बीड - पंकजा मुंडे

परभणी - दिवाकर रावते

सिंधुदुर्ग - दीपक केसरकर

पालघर - विष्णु सावरा

गडचिरोली - अंबरिश अत्राम

भंडारा गोंदिया - राजकुमार बडोले

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 24, 2014 07:27 PM IST

ताज्या बातम्या