हिवाळी अधिवेशनाचं सूप वाजलं

हिवाळी अधिवेशनाचं सूप वाजलं

  • Share this:

adhiveshan_24 डिसेंबर : सुरुवातीपासून वादळी ठरलेलं विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशनाचं सूप अखेर वाजलं. विरोधकांचा गोंधळ, गदारोळ, मोर्चाने अधिवेशन गाजलं. अधिवेशनाच्या सरत शेवटला मराठा आरक्षण विधेयक, केळकर समितीचा अहवाल मांडण्यात आला. तसंच अनेक घोषणांनीही अधिवेशनाने आज सांगता झाली.

भाजप आणि शिवसेना सरकारचं पहिलं अधिवेशन असल्यामुळे वेगळं महत्व प्राप्त झालं होतं. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने सुरुवातीपासून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. पण सुरुवात विरोधकांनी केली आणि शेवट युती सरकारने केला. या अधिवेशनात मराठा आरक्षणाचं विधेयक मंजूर करून घेण्यात आलंय. त्यानुसार नोकरी आणि शिक्षणात 16 टक्के आरक्षण लागू होणार आहे. या अधिवेशनात मुस्लीम आरक्षणाचा निर्णय मात्र होऊ शकला नाही. मुस्लीम आरक्षणच्या मुद्द्यावरून त्यामुळे विरोधकांनी विधानभवनाबाहेर आंदोलन केलं. तसंच गारपीट आणि अवकाळी पावसामुळे हवालदील झालेल्या शेतकर्‍यांसाठी 7 हजार कोटींचं पॅकेज जाहीर करण्यात आलं.बहुचर्चित केळकर समितीचा अहवालही या अधिवेशनात विधानसभेत मांडला गेला पण त्यावरची चर्चा मात्र सरकारनं टाळली. त्यामुळे केळकर समितीच्या अहवालावर चर्चा करण्यासाठी जानेवारीत विशेष अधिवेशन बोलवा अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलीय. दरम्यान, सरकार शेतकर्‍यांच्या प्रश्नावर सरकार गंभीर नाही, शेतकर्‍यांच्या तोंडाला सरकारने पान पुसली असा आरोप विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. आता पुढील अर्थसंकल्पीय अधिवेशन 9 मार्चपासून भरणार अशी घोषणा विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केली.

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 24, 2014 07:03 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...