रिपब्लिकन ऐक्यासाठी मुंबईत बैठक

रिपब्लिकन ऐक्यासाठी मुंबईत बैठक

6 ऑगस्ट रिपब्लिकन पक्षांच्या बहुचर्चित ऐक्यासाठी गुरुवारी मुंबईत बैठक होते आहे. रिपब्लिकन नेते रामदास आठवले यांनी ही बैठक बोलावली आहे. लोकसभा निवडणुकीतल्या रिपब्लिकन उमेदवारांच्या पराभवामुळे रिपब्लिकन ऐक्याची गरज आहे. या चर्चेला पुन्हा एकदा सुरुवात झाली होती. त्यामुळे विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सगळे रिपब्लिकन पक्ष एकत्र येणार का? याची उत्सुकता आहे. गुरूवारच्या बैठकीला अठरा प्रमुख रिपब्लिकन संघटनांना बोलावण्यात आले आहे. त्यात प्रकाश आंबेडकर, जोगेंद्र कवाडे, टी. एम. कांबळे आणि इतर रिपब्लिकन नेते असतील. 1998 च्या लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच सगळे रिपब्लिकन पक्ष एकत्र येतील अशी शक्यता आहे. त्यामुळे बैठकीत काय ठरतंय याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

  • Share this:

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 6, 2009 09:00 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...