ज्येष्ठ लेखिका डॉ.माधवी सरदेसाई यांचं निधन

ज्येष्ठ लेखिका डॉ.माधवी सरदेसाई यांचं निधन

  • Share this:

Dr.-Madhavi-Sardesai1

23 डिसेंबर : साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या डॉ. माधवी सरदेसाई यांचं मडगाव इथल्या राहत्या घरी निधन झालं. त्या 52 वर्षांच्या होत्या. गेल्या वर्षभरापासून आजारी असलेल्या माधवी सरदेसाईंनी आज पहाटे 4.30 च्या सुमार अखेरचा श्वास घेतला.

कोकणी साहित्यातील ज्येष्ठ लेखिका, कवयित्री आणि भाषाशास्त्रज्ञ अशी त्यांची ओळख होती. भासाभास, माणकुलो राजकुमार' ही त्यांची गाजलेली पुस्तकं आहे. माधवी सरदेसाई गोवा विद्यापीठाच्या कोकणी विभागच्या विभागप्रमुखाही होत्या. याआधी सरदेसाईंना 'एका विचाराची जीवंत कथा' या महात्मा गांधी यांच्या जीवनावरील भाषांतर केलेल्या पुस्तकाला साहित्य अकादमी पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. 'जाग' या कोकणी मासिकाचं संपादकपदही त्यांनी भुषवलं होतं. गेल्याच आठवड्यात त्यांच्या मंथन या पुस्तकाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. त्यांच्या जाण्याने साहित्य विश्वात एक पोकळी निर्माण झाली आहे.

Follow @ibnlokmattv

First published: December 23, 2014, 9:57 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading