उद्धव ठाकरेंची मध्यस्थी, नाट्यसंमेलन बेळगावमध्येच होणार !

उद्धव ठाकरेंची मध्यस्थी, नाट्यसंमेलन बेळगावमध्येच होणार !

  • Share this:

uddhav_on_natya_samelan22 डिसेंबर : 95 वं अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन बेळगावमध्येच होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर मराठी नाट्यसंमेलन आता बेळगावमध्येच होणार आहे.

नाट्यपरिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांच्या वादग्रस्त व्यक्तव्यामुळे नाट्यसंमेलन वादात सापडलं होतं. सीमाभागाचा मुद्दा आम्ही संमेलनात मांडणार नाही. ही काही त्यासाठी जागा नाही अशी भूमिकाच जोशी यांनी घेतली होती. मात्र, आपल्या विधानावर सारवासारव करत जोशींनी माफीनामा सादर केला. पण,जोशी यांच्या वक्तव्यामुळे नाट्य संमेलन बेळगावमध्ये होऊ देणार नाही अशी आक्रमक भूमिका एकीकरण समितीने घेतली होती.

अखेरीस हा वाद आज 'मातोश्री'वर पोहचला. नाट्यपरिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी आणि इतर पदाधिकारी यांची आणि एकीकरण समितींच्या सदस्यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. याबाबत मातोश्रीवर दोन्ही गटांची बैठक घेण्यात आली होती. वाद जास्त न ताणता झालं गेलं विसरून संमेलन यशस्वी करण्यासाठी सर्वांनी काम करावं असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं आणि ते सर्वांनी मान्य केलं. संमेलन यशस्वी करण्यासाठी मदत करण्याचं आश्वासनही उद्धव यांनी दिलं.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 22, 2014 08:36 PM IST

ताज्या बातम्या