26/11 चा हल्ला टाळता आला असता, 'न्यूयॉर्क टाईम्स'चा खुलासा

26/11 चा हल्ला टाळता आला असता, 'न्यूयॉर्क टाईम्स'चा खुलासा

  • Share this:

26 11 attack_new york22 डिसेंबर : मुंबईवर झालेला 26/11चा भीषण दहशतवादी हल्ला टाळता आला असता असं खळबळजनक वृत्त अमेरिकेच्या 'न्यूयॉर्क टाईम्स'ने दिलंय. हल्ल्यापूर्वी भारत, ब्रिटन आणि अमेरिका या तिन्ही देशांना गुप्तचर संस्थांकडे हल्ल्याची माहिती मिळाली होती. पण याकडे वेळीच लक्ष न दिल्यामुळे हा हल्ला घडला असंही या वृत्तात म्हटलंय.

मुंबईवर झालेल्या 26/11च्या हल्ल्याला सहा वर्ष पूर्ण झाली आहे. या हल्ल्याप्रकरणी आज अमेरिकेचं प्रसिद्ध वृत्तपत्र 'न्यूयॉर्क टाईम्स'ने

वृत्त प्रसिद्ध केलंय. भारत, ब्रिटन आणि अमेरिका या तिन्ही देशांना या 26/11 च्या हल्ल्यापूर्वी निरनिराळ्या सूत्रांद्वारे माहिती मिळाली होती. पण तिन्ही देशांच्या गुप्तचर यंत्रणांमध्ये ताळमेळ नसल्यामुळे या माहितीचा योग्य उलगडा करण्यात तिन्ही देशांना अपयश आलं आणि हा हल्ला घडवण्यात लष्कर-ए-तोय्यबाला यश आलं, अशी माहिती न्यूयॉर्क टाईम्सनं दिलीये. ज्यावेळी हा हल्ला सुरू होता तेव्हा कराचीमधल्या कंट्रोल रुममधील संभाषणाची ऑडिओ फाईल हाती लागली आहे असा दावाही न्यूयॉर्क टाईम्सने केलाय.

या हल्ल्याचा कट रचण्यात झरार शहा याचा महत्त्वाचा हात होता. झरार शहा हा लष्कर ए तोय्यबा चा टेक्नॉलॉजी प्रमुख होता. तो कराचीमध्ये बसून हल्ल्याची सूत्रं हलवत होता. मुंबईबाबत त्यानं इंटरनेटच्या माध्यमातून खडान् खडा माहिती जामा केली होती. 'गुगल अर्थ'चा वापर करून तो दहशतवाद्यांना हल्ल्यांच्या ठिकाणी कसं पोहोचायचं याचं मार्गदर्शन करत होता. तसंच त्यानं इंटरनेट फोन बसवले होते, त्याद्वारे तो स्वतःचं स्थान न्यू जर्सी असल्याचं दाखवत होता. 2008 मध्ये त्याच्या कारवायांवर भारतीय आणि ब्रिटीश गुप्तचर यंत्रणा एकाचवेळी लक्ष ठेऊन होत्या. पण मिळालेल्या माहितीचा अर्थ लावण्यात दोन्ही देशांच्या गुप्तचर यंत्रणांना यश आलं नाही. इतकंच नाही, तर त्याचवेळी अमेरिकेलाही इतर काही सूत्रांकडून भारतामध्ये दहशतवादी हल्ला होऊ शकतो असे संकेत मिळाले होते, त्याची सूचनाही अमेरिकेनं दिली. मात्र गुप्तचर यंत्रणा याचं विश्लेषण करण्यात अपयशी ठरल्यात. या माहितीचा योग्य उपयोग झाला असता तर हा हल्ला टळला असता असं न्यूयॉर्क टाईम्सनं म्हटलंय.

Follow @ibnlokmattv

First published: December 22, 2014, 5:42 PM IST

ताज्या बातम्या