मुंबई हल्ल्याच्या सुनावणीला भारताकडूनच उशीर- पाकिस्तान

मुंबई हल्ल्याच्या सुनावणीला भारताकडूनच उशीर- पाकिस्तान

  • Share this:

M_Id_438736__Sartaz_

21 डिसेंबर :  26/11 मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या सुनावणीला भारताकडूनच उशीर झाल्याचे, पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे राष्ट्रीय सुरक्षा आणि परराष्ट्र व्यवहारांचे सल्लागार सरताज अझिझ यांनी म्हटलं आहे.

मुंबई दहशतवादी हल्ल्यातील प्रमुख आरोपी झकीउर रेहमान लख्वीयाला पाकिस्तानमधल्या दहशतवादी न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर भारताने त्याचा तिव्र शब्दात निषेध नोंदविला होता. भारताने नोंदवलेल्या निषेधानंतर लख्वीला तुरूंगातच ठेवणार निर्णय पाकने घेतला होता. तसेचं त्याच्या जामीनाला आव्हान देणारी याचिका दाखल करण्याचा निर्णय पाकिस्तान सरकारने घेतला आहे. पेशावर शहरातील शाळेवर दहशतवाद्यांनी केलेल्या भीषण हल्ल्यात लहान मुलांचा मृत्यू झाल्यानंतर, पाकिस्तानकडून दहशतवाद्यांविरोधात कडक कारवाई करण्यास सुरूवात केली आहे.

अझिझ म्हणाले, 'मुंबई हल्ल्यासंदर्भातील सुनावणी आमच्याकडून युद्धपातळीवर सुरू आहे. आमच्याकडील न्याय समिती, सप्टेंबर 2013 पासून भारताकडे काही प्रत्यक्षदशीर्ंचा जबाब नोंदवाण्याची परवानगी मागत आहोत. पण भारताने ही परवानगी नाकारली आहे. जबाब नोंदवल्यानंतरचं या खटल्याबाबत पुढची सुनावणी होऊ शकते. त्यामुळे आम्हाला भारताकडून आशा आहे, की भारत लवकरात लवकर आम्हाला परवानगी देईल. तसेच समझौता एक्स्प्रेस स्फोट प्रकरणातही भारताकडून लवकर निकाल लावण्यात येईल, अशी आम्हाला आशा आहे.

Follow @ibnlokmattv

First published: December 21, 2014, 2:53 PM IST

ताज्या बातम्या