इंफाळमध्ये स्फोटात तीन ठार, चार जखमी

इंफाळमध्ये स्फोटात तीन ठार, चार जखमी

  • Share this:

bomb-explosion1

21 डिसेंबर : मणिपूरची राजधानी इम्फाळ शहरातील खुयाथाँग भागात आज (रविवारी) सकाळी दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटात तीन नागरिकांचा मृत्यू झाला. तर, चार जण जखमी आहेत.

 इंफाळ बाजाराजवळील रस्त्याच्या कडेला आज (रविवारी) सकाळी मोठा शक्तिशाली स्फोट झाला. आयईडी स्फोटकांच्या मदतीने हा शक्तिशाली स्फोट घडवून आणल्याचे पोलिसांनी यावेळी सांगितले. यात तीन कामगार ठार तर चार जण गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

Follow @ibnlokmattv

First published: December 21, 2014, 1:08 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading