'दादा'ची टीम ठरली इंडियन सुपर लीगची चॅम्पियन

'दादा'ची टीम ठरली इंडियन सुपर लीगची चॅम्पियन

  • Share this:

kolkata_team_win20 डिसेंबर : इंडियन सुपर लीगमध्ये सौरव गांगुलीच्या ऍटलेटिको कोलकातानं सचिन तेंडुलकरच्या केरला ब्लास्टर्सचा पराभव करत इंडियन सुपर लीगचं पहिलं जेतेपद पटकावलंय. मोहम्मद रफिकने विजयी गोल लगावत कोलकाता टीमने इंडियन सुपर लीगच्या चषकावर नाव कोरलंय.

तब्बल दोन महिने सुरू असलेल्या फुटबॉलच्या या महामेळ्याची आज शानदार सांगता झाली. मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियमवर नेत्रदिपक सोहळा पार पडला. आजच्या फायनल मॅचमध्ये क्रिकेटचे दोन दिग्गज सौरभ गांगुली आणि सचिन तेंडुलकर आमने-सामने आले.

ऍटलेटिको कोलकाता आणि केरला ब्लास्टर्स दरम्यानच्या मॅचच्या निर्धारीत 90 मिनिटांत दोन्ही टीम्स गोल करण्यात अपयशी ठरल्या. केरला ब्लास्टर्स आणि ऍटलेटिको कोलकाता या दोन्ही टीम्सनं अत्यंत आक्रमक खेळ केला. पण कोणीही गोल करु शकलं नाही. पण 90 मिनिटांनंतरच्या इंज्युरी टाइममध्ये अगदी शेवटच्या काही क्षणांमध्ये मोहम्मद रफिकनं गोल करत ऍटलेटिको कोलकाताला स्पर्धेचं जेतेपद मिळवून दिलं. मोहम्मद रफिकचा या स्पर्धेतला हा पहिलाच गोल ठरला. पण याच गोलनं कोलकात्याला विजेतेपद मिळवून दिलं. मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियमवर खच्चून भरलेल्या प्रेक्षकांच्या साथीनं ऍटलेटिको कोलकातानं इंडियन सुपर लीगचं पहिलं जेतेपद पटकावलं.

Follow @ibnlokmattv

First published: December 20, 2014, 10:42 PM IST

ताज्या बातम्या