लख्वी तुरुंगातच राहणार, पाकिस्तान सरकारचा निर्णय

लख्वी तुरुंगातच राहणार, पाकिस्तान सरकारचा निर्णय

  • Share this:

laksh

19 डिसेंबर :  मुंबईतील 26/11च्या हल्ल्याचा मास्टर माइंड आणि लष्कर- ए- तय्यबाचा कमांडर झकिउर सहमान लख्वीला दहशतवादविरोधी न्यायालयाने जामीन दिला असला तरी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने त्याची तुरुंगातून सुटका करणार नाही असे स्पष्टीकरण पाकिस्तान सरकारने दिले आहे.

पाकिस्तानमधील दहशतवादविरोधी न्यायालयाने झकीउर रहमान लखवीला काल (गुरुवारी) जामीन मंजूर केला होता. मात्र स्थानिक प्रशासनाने झकीरला पुन्हा ताब्यात घेत त्याला तुरुंगातच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. लखवीच्या सुटका झाल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याचे पाकिस्तान सरकारने म्हटले असून लखवी ज्या तुरुंगात आहे त्या तुरुंगाचे सर्व दरवाजेही बंद करण्यात आले आहे. यासोबतच दहशतवादविरोधी न्यायालयाच्या निर्णयाला वरिष्ठ कोर्टात आवाहन देऊ अशी माहिती मुख्य सरकारी वकिल अझहर चौधरी यांनी दिली आहे.

झकीउर लखवी हा 26/11 च्या मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड असून त्याच्या सुटकेवर भारताने तीव्र निषेध नोंदवला होता. दहशतवादाविरोधात कठोर पावले उचलण्याची घोषणा पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी केली असतानाच न्यायालयाने झकीउर लखवीला जामीन दिल्याने पाकिस्तानचा दुटप्पीपणा सर्वांसमोर आला होता. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानेही या निर्णयाविरोधात आज (शुक्रवारी) पाकिस्तान सरकारकडे निषेध व्यक्त केला. अशा स्थितीत पाकिस्तान सरकार दहशतवादाशी कसा लढा देईल असा प्रश्नही भारताने विचारला आहे. त्यानंतर पाकिस्तान सरकारने लख्वीच्या जामिनाला विरोध करण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, पेशावरमधील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान सरकार येत्या एक ते दोन दिवसांत 17 अतिरेक्यांना फाशी देणार आहे. 80 अतिरेक्यांविरोधात फाशीचे वॉरंट काढण्यात आलं आहे.

Follow @ibnlokmattv

First published: December 19, 2014, 1:19 PM IST

ताज्या बातम्या