सलग तिसर्‍या दिवशी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

  • Share this:

gvf655mumbai_local

17 डिसेंबर : गेल्या काही दिवसांपासून वारंवार तांत्रिक बिघाडांमुळे होणारा मध्य रेल्वेच्या वाहतुकीचा खोळंबा आज (बुधवारी) सकाळीही पुन्हा एकदा अनुभवण्यास मिळाला.

मध्य रेल्वेच्या मुंब्रा आणि कळवा या स्थानकांदरम्यान पेटाग्राफ तुटल्याने मुंबईकडे जाणार्‍या वाहतुकीची कोंडी झाली. रेल्वेच्या गाड्या 20 ते 25 मिनिटे उशीराने धावत असल्याने सकाळाच्या वेळेत आपापली ऑफिस गाठण्याच्या घाईत असलेल्या मुंबईकरांना मात्र त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या काही दिवसांत रूळाला तडे जाणे, ओव्हरहेड वायर तुटणे अशा काही कारणांमुळे मध्य रेल्वेची सेवा अनेकदा खंडित होताना दिसली होती.

गेले अनेक महिने मध्य रेल्वेमार्गावर बिघाड आणि अपघाताचे सत्र सातत्याने सुरू असलेले पहायला मिळत आहे. वारंवार मेगाब्लॉक आणि दुरूस्ती करूनही तांत्रिक बिघाड होताना दिसत आहेत.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 17, 2014 08:57 AM IST

ताज्या बातम्या