रक्तरंजित पेशावर;132 मुलांसह 141 ठार, 9 दहशतवाद्यांचा खात्मा

रक्तरंजित पेशावर;132 मुलांसह 141 ठार, 9 दहशतवाद्यांचा खात्मा

  • Share this:

pak_peshavar23216 डिसेंबर : अतिरेक्यांचं माहेर घर बनलेल्या पाकिस्तानला आज त्याचीच किंमत चुकावी लागलीये. तालिबानी दहशतवाद्यांनी पेशावरमधील एका लष्करी शाळेवर आत्मघातकी हल्ला चढवला. या हल्ल्यात 141 जणांचा मृत्यू झालाय. यात 132 शाळकरी मुलं आणि 9 कर्मचार्‍यांचा ठार मारण्यात आलंय. तसंच अनेक मुलं जखमीही झाली आहेत. शाळेत घुसलेल्या नऊही अतिरेक्यांना ठार मारण्यात पाक लष्काराला यश आलंय. तब्बल आठ तासांनंतर आता हे ऑपरेशन आता अंतिम टप्प्यात आहे. या हल्ल्याची जबाबदारी तहरिक-ए-तालिबान संघटनेनं घेतली आहे.

ऑस्ट्रेलियातील सर्वात मोठे शहर सिडनी ओलीसनाट्यामुळे हादरली. ही घटना ताजी असतानाच आज पाकिस्तानात तालिबान्यांच्या आत्मघातकी हल्ल्याने जगाला हादरा दिला. माणुसकीची परिसिमा गाठणारा क्रुर प्रकारामुळे अवघे जग सुन्न झाले. आज सकाळी 11 वाजेच्या सुमारास नऊ दहशतवाद्यांनी पेशावर मधील एका लष्काराच्या पब्लिक स्कुलमध्ये प्रवेश केला. सर्व दहशतवादी लष्काराच्या गणवेशात होते. त्यामुळे त्याकडे फारसं कुणी लक्ष दिलं नाही. शाळेत चौथा वर्ग सुरू असताना अचानक गोळीबाराचा आवाज ऐकू आला आणि एकच धावपळ उडाली. दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला आणि 500 शालेय विद्यार्थ्यांना ताब्यात घेतलं. या थरारक घडनेतून मागील दारातून काही शाळकरी मुलं जीव मुठीत धरून बाहेर पडली. त्यांनी घडलेली सगळी हकीकत मीडियाला सांगितलं. आतमध्ये बंधक असलेले सर्व जण असुरक्षित आहे. दहशतवाद्यांनी या सर्व मुलांना डोक्यात आणि छातीत गोळ्या झाडून ठार केलंय.

निष्पाप मुलांवर या दहशतवादी हल्ल्यामुळे जगभरातून निषेध व्यक्त होत आहे. या हल्ल्याची जबाबदारी तहरिक-ए-तालिबानने घेतलीय. या हल्ल्यानंतर काही वेळातच तहरिक-ए-तालिबानचा दहशतवादी मोहम्मद खोरासानी पाकचे टीव्ही चॅनेल जिओ टीव्हीला प्रतिक्रिया दिली. आम्हीच सहा लोकांना हा हल्ला करण्यासाठी पाठवलं होतं. यामध्ये एक आत्मघातकी हल्लेखोरपण सहभागी होता. आम्ही मोठ्या मुलांना मारण्याचे आदेश दिले होते छोट्या मुलांना मारण्यासाठी सांगितलं नव्हतं असं निर्लज्जपणे खोरासनी सांगत होता. वझिरीस्तानमधल्या कारवाईचा हा बदला घेतल्याचा दावाही त्याने केला.

ज्या शाळेवर हा हल्ला झाला ती शाळा पेशावरच्या प्रसिद्ध वारसाक रोडवर बिहारी कॉलनीजवळ आहे. या शाळेजवळ लष्कराचं संरक्षण असतं. स्थानिक मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, हे दहशतवादी शाळेजवळील स्मशानभूमीच्या भिंतीवर उड्या टाकून शाळेत दाखल झाले. या तालिबान्यांनी मुलांना ठार मारण्याच्या इदाद्यानेच शाळेत प्रवेश केला होता. त्यामुळे लहान मुलं आणि मोठी मुलं यात या निर्दयी दहशतवाद्यांनी फरक केला नाही. 132 शाळकरी मुलांवर बेछुट गोळीबार करून त्यांना ठार मारले. मागील आठवड्यातच पाकिस्तानची कन्या मलाला युसुफझाई हिला शांततेचा नोबेल पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. तिच्या या यशाबद्दल पाकिस्तानमध्ये आनंद साजरा होत असताना तालिबान्यांनी दहशतवादी हल्ला करून आनंदावर पाणी फेरले. या हल्ल्या प्रकरणी पाकिस्तानात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आलाय.दहशतवादाचा बिमोड होत नाही, तोवर लढाई सुरूच ठेवणार, असं पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी म्हटलंय.

भारताने केला हल्ल्याचा निषेध

भारताच्या पराराष्ट्र मंत्रालयानं या हल्ल्याचा निषेध केलाय. परराष्ट्रमंत्रालयाचे प्रवक्ते सय्यद अकबरूद्दीन यांनी ट्विटरवरून यांनी हा निषेध व्यक्त केला. "पेशावरमध्ये शाळेतल्या निरागस मुलांवर झालेल्या हल्ल्याचा आम्ही निषेध करतो. अतिरेक्यांचा हा हल्ला अतिशय भयानक आहे. ज्या मुलांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटूंबियांप्रती आमची सहानुभूती आहे." अशी प्रतिक्रिया सय्यद अकबरूद्दीन यांनी दिली.

आज काळा दिवस - सत्यार्थी

शांततेचा नोबल पुरस्कार विजेते कैलाश सत्यर्थी यांनी ट्विटवर प्रतिक्रिया दिली, "पेशावरमध्ये शाळेत झालेल्या हल्ल्यात 100 हून जास्त मुलं मारली गेली. या पीडित कुटुंबीयांच्या दु:खात मी सामील आहे. मानवतेच्या इतिहासातला आज काळा दिवस आहे."

मलाला युसुफझाई- हिने ट्विट करून आपल्या भावना व्यक्त केल्यात.'या संवेदनाहीन आणि निर्घृण हल्ल्यामुळे मी हेलावून गेलेय.'

कोण आहे ही तहरीक-ए-तालिबान संघटना?

- पाकिस्तानातल्या वायव्य सरहद्द प्रांतात या अतिरेकी संघटनेचे केंद्र आहे

- 2007 मध्ये जहाल विचारांच्या 13 गटांनी एकत्र तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानची स्थापना केली

- 2008 मध्ये या अतिरेकी संघटनेवर पाकिस्तान सरकारनं बंदी घातली

Follow @ibnlokmattv

First Published: Dec 16, 2014 09:55 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading