अखेर गारपीटग्रस्तांना सरकारकडून मदत जाहीर

  • Share this:

hailstorm in maharashtra (4)16 डिसेंबर : अस्मानी संकटाने हैराण झालेल्या गारपीटग्रस्तांना अखेर सरकारकडून दिलासा मिळाला आहे. गारपीटग्रस्तांसाठी आज विधान परिषदेत महसूलमंत्री आणि कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी मदतीची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, नुकसानग्रस्त शेतकर्‍यांसाठी हजारांत मदत जाहीर करण्यात आली तर अवकाळी पाऊस आणि गारपिटीत मृत्यू झाल्यास 2.5 लाखांची मदत जाहीर करण्यात आलीये.

कोरडवाहू शेतीसाठी हेक्टरी 10 हजार रुपये मदत तर बागायतीसाठी हेक्टरी 15 हजार रुपये मदत जाहीर झालीय. फळबागांसाठी हेक्टरी 25 हजार रुपये मदत जाहीर करण्यात आलीय. गारपीट किंवा अवकाळी पावसात मृत्यू झाला तर आतापर्यंत 1लाखांची मदत करण्यात येत होती. पण आता अडीच लाखांची मदत देण्यात येणार आहे. पावसामुळे कच्चं घर पडलं असेल तर 25 हजार रूपये आणि पक्कं घर पडलं असेल तर 70 हजार रूपये मदत देण्यात येणार आहे. महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी ही माहिती दिली. दरम्यान, ही मदत अपुरी असल्याचं म्हणत विधानपरिषदेत विरोधकांनी सभात्याग केला.

गारपीटग्रस्तांना सरकारकडून मदत

- कोरडवाहूसाठी 10 हजार पर हेक्टर मदत

- बागायतीसाठी 15 हजार रूपये पर हेक्टर मदत

Loading...

- फळबागांसाठी 25 हजार रूपये प्रति हेक्टर मदत जाहीर

- कच्चं घर पडलं असेल तर 25 हजार रूपये

- पक्कं घर पडलं असेल तर 70 हजार रूपये मदत

- मृत्यूसाठी 1 लाख ऐवजी अडीच लाख रूपये माहिती

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 16, 2014 06:00 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...