अखेर सिडनी ओलीसनाट्य संपले, भारतीय सुखरूप

अखेर सिडनी ओलीसनाट्य संपले, भारतीय सुखरूप

  • Share this:

Sydney hostage23452315 डिसेंबर : : अखेर 16 तासांनंतर सिडनीतील एका कॅफे शॉपमधील सुरू असलेलं ओलीसनाट्य संपलंय. पोलिसांनी ओलीस ठेवणार्‍या दहशतवाद्याला अटक केलीय. शेख मान हारून मोनीस असं या बंदूकधार्‍याचं नाव आहे. मोनीस हा इराणचा नागरिक आहे. ओलीस ठेवलेल्या सर्व नागरिकांची सुटका करण्यात आलीये. यात एका भारतीयाचाही समावेश आहे. मात्र, या कारवाईत दोन नागरिकांचा हार्ट अटॅकनं मृत्यू झाला आहे. तब्बल 16 तासांच्या या थरारनाट्यानंतर नागरिकांची सुटका झाल्यानंतर सर्वांनी सुटकेचा श्वास सोडलाय. मात्र, दहशतवाद्यांचा हेतू काय होता हे अजून स्पष्ट झालं नाहीये.

ऑस्ट्रेलियाच्या प्रमुख शहरांपैकी एक असलेली सिडनी आज दहशतवादी कृत्याने हादरली. सिडनीतील लिंट कॅफेमध्ये इराणी विस्थापित असलेल्या शेख मान हारून मोनीस आणि त्याच्या एका सहकार्‍याने सुमारे 50 जणांना ओलीस धरले होते. या 50 जणांमध्ये एका भारतीयाचाही समावेश असल्याचं स्पष्ट झालं. आंध्रप्रदेशचा रहिवासी असलेला विश्वकांत अंकित रेड्डी या कॅफेमध्ये अडकला होता. विश्वकांत हा इन्फोसिसचा कर्मचारी आहे. सुरुवातील हल्लेखोरांच्या तावडीतून पाच जणांनी आपला जीव मुठीतून धरून पळ काढला होता. जे नागरीक बाहेर आले होते त्यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी पुढे कारवाईचा फासळा लावला. लोकांना ओलीस ठेवणार्‍या या दहशतवाद्यांनी कॅफेच्या खिडकीच्या बाहेर काळे झेंडे दाखवले होते. जगात देव नाही तर अल्लाह आहे आणि मोहम्मद त्याचा दूत आहे, असं अरबी भाषेत या काळ्या झेंड्यावर लिहिलं होतं. पोलिसांनी सुरुवातील या दहशतवाद्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र या दहशतवाद्यांनी थेट ऑस्ट्रेलियातचे पंतप्रधान टोनी ऍबॉट यांच्याशी चर्चा करण्याची प्रस्ताव मांडला होता.

पोलिसांनी या कॅफेला घेराव घातला होता. तसंच कॅफेजवळील मुख्य इमारती आणि प्रसिद्ध ऑपेरा हाऊसही मोकळे करण्यात आले होते. अखेर सोळा तासांनंतर पोलिसांच्या हालचालींना वेग आला. रात्री पोलिसांनी बॉम्ब निकामी करणारा रोबोट कॅफेमध्ये पाठवला. रोबोटने आपलं काम चोख बजावलं आणि पोलिसांनी त्यापाठोपाठ कॅफेमध्ये प्रवेश केला. पोलिसांनी यावेळी गोळीबार केला. दहशतवाद्यांनीही याला प्रत्युत्तर दिलं. अखेरील पोलिसांच्या कारवाईपुढे दहशतवादी शरण आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. मात्र या सर्व कारवाईत दोन नागरिकांचा मृत्यू झालाय. या दोन नागरिकांचा मृत्यू हॉर्ट ऍटॅकने झाला असा दावा सीएनएनने केलाय. ओलिसांना कॅफेमधून लोकांना स्ट्रेचवरून बाहेर काढण्यात येतंय. एक भारतीय स्वॉफ्टवेअर इंजिनीअरही आत अडकला होता. त्यालाही बाहेर काढण्यात आलंय. विश्वकांत अंकित रेड्डी असं या तरुणाचं नाव आहे. इन्फोसिसचा तो कर्मचारी आहे. तो आंध्र प्रदेशचा राहणारा आहे. त्याचं मेडिकल चेकअप सध्या सुरू आहे त्यानंतर तो घरी परतेल, असं परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी सांगितलंय.

कोण आहे हारून मोनीस?

- ओलीस ठेवणारा अतिरेकी मन हारून मोनीस हा इराणी नागरिक असून, त्यानं ऑस्ट्रेलियात राजकीय शरण घेतली होती

-तो कुठल्याही अतिरेकी संघटनेशी संबधित नाहीये

- मात्र त्याची पार्श्वभूमी ही गुन्हेगारी स्वरूपाची आहे

- त्याच्यावर ऑस्ट्रेलियात अनेक खटले सुरू असून तो जामीनावर बाहेर आला होता

Follow @ibnlokmattv

First published: December 15, 2014, 9:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading