खुशखबर ; पेट्रोल आणि डिझेल 2 रुपयांनी स्वस्त

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Dec 15, 2014 09:28 PM IST

petrol price hike15 डिसेंबर : महागाईने होरपळणार्‍या सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळालाय. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्यात आलीये.

आज मध्यरात्रीपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती प्रति लिटर 2 रुपयांनी कमी होणार आहेत.ही दरकपात आज मध्यरात्रीपासून लागू होणार आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेलाच्या किंमतीत झालेल्या बदलांमुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कपात झाली आहे. विशेष म्हणजे, 30 नोव्हेंबरला पेट्रोलच्या दरात 0.91 तर डिझेल 0.84 पैशांनी कपात करण्यात आली होती.

तसंच त्याअगोदर नोव्हेंबर महिन्यातच पेट्रोल 2.41 तर डिझेल 2.25 रुपयांनी स्वस्त झालं होतं. आतापर्यंत ऑगस्ट महिन्यापासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होण्याची ही तब्बल आठवी वेळ आहे.

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 15, 2014 09:28 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...