Elec-widget

मुंबईत H1N1चा नवा रुग्ण : राज्यातल्या पेशंट्सची संख्या 54वर

25 जुलैराज्यात आतापर्यांत 54 जणांना H1N1 ची बाधा झाल्याचं दिसून आलंय. पुण्यात H1N1 ची बाधा झालेल्यांची संख्या 36 झाली आहे. अभिनव शाळेच्या 19 विद्यार्थ्यांना H1N1 ची लागण झालीय. त्यातल्या 11 जणांना उपचारानंतर नायडू हॉस्पिटलमधून घरी पाठवण्यात आलं. त्यातच काल सिम्बॉयसिस शाळेच्या एका विद्यार्थ्याला आणि सेवा सदनच्या एका विद्यार्थ्याला H1N1 ची लागण झाल्याचं आढळलं. हे दोघेजण अभिनव शाळेच्या विद्यार्थ्यांचे मित्र आहेत. मुंबईतही शनिवारी H1N1 चा एक रुग्ण आढळला. पवईत राहणारा हा 23 वर्षांचा तरुण दोन दिवसांपूर्वीच सिंगापूरहून परतला होता. त्याला कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. पुण्यात नायडू हॉस्पिटल, यशवंतराव चव्हाण मेमोरियल हॉस्पिटल, पिंपरी चिंचवड, औंध सिव्हील हॉसिप्टलमध्ये H1N1 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या हॉस्पिटलची क्षमता प्रत्येकी 20 बेड्सची आहे. पुण्यात या रोगाचा प्रसार होऊ नये म्हणून अभिनव शाळा बंद ठेवण्यात आली असून शाळेत युद्धपातळीवर स्वच्छता सुरू आहे. H1N1 चा व्हायरस पूर्णपणे नष्ट व्हावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. H1N1 ची बाधा झालेल्या मुलांना आणि त्यांच्या पालकांना तर पूर्णपणे विश्रांती सांगण्यात आलीय. ही मुलं ट्यूशन्सला जाऊ शकत नाहीत, ना खेळायला. त्यांच्याकडे घरकाम करणा-यांनाही तिथे जायला मनाई करण्यात आलीय. H1N1 च्या व्हायरसची शरारीत वाढ व्हायला आठ दिवस लागतात आणि मग स्वाइन फ्लूचा धोका असतो. त्यामुळे आठ दिवस काटेकोरपणे काळजी घ्यावी लागते. एक आठवड्यानंतर त्या व्यक्तीत स्वाइन फ्लू ची लक्षणं दिसली नाहीत तर ती व्यक्ती पूर्णपणे बरी झाली, असं म्हणता येतं. त्यामुळे पालकांना त्यांच्या घराची डेटॉल, फिनाइलनं स्वच्छता करायला सांगण्यात आलंय. त्यांनी हात लावलेली प्रत्येक वस्तू स्वच्छ करावी लागणारेय. कारण हा व्हायरस 2 ते 8 तास जिवंत राहू शकतो. एवढंच नव्हे तर या पालकांनी त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची नावं H1N1 च्या उपचार केंद्राला कळवायची आहेत. H1N1 ची बाधा आणखी लोकांना होऊ नये यासाठी पुणे महापालिका काळजी घेतेय. कारण गणेशोत्सव जवळ आलाय. या रोगाला आताच आटोक्यात आणलं नाही तर पुणे शहराच्याच आरोग्यासाठी हे कठीण होऊन बसेल, अशी भीती महापालिकेच्या अधिका-यांना वाटतेय.

  • Share this:

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 25, 2009 12:26 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...
Listen to the latest songs, only on JioSaavn.com