जितेंद्र आव्हाडांचं निलंबन मागे

  • Share this:

jitendra awadha15 डिसेंबर : भर सभागृहात मंत्र्यांविरोधात अपशब्द काढल्या प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचं निलंबन अखेर मागे घेण्यात आलंय. या संबंधी संसदीय कार्यमंत्री गिरीष बापट यांनी विधानसभेच्या अधिवेशनात घोषणा केलीय. आव्हाड यांचं निलंबन मागे घेतल्यानंतर राष्ट्रवादीने कामकाजात सहभाग घेतलाय.

मागील आठवड्यात 12 डिसेंबर रोजी सभागृहात दुष्काळी पॅकेजवर चर्चा सुरू असताना जितेंद्र आव्हाड यांनी अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत जमून शेतकर्‍यांना देण्यात येणार्‍या पॅकेजवरून गोंधळ घातला होता आणि मंत्र्यांबद्दल अपशब्द उद्गारला होता. यामुळे संसदीय कार्यमंत्री गिरीष बापट यांनी अधिवेशन संपेपर्यंत आव्हाडांवर निलंबनाची कारवाई केली होती. आव्हाड यांच्या निलंबनाची कारवाई केल्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीने सभागृहाच्या कामावर बहिष्कार घातला होता. अखेर आज सोमवारी सभागृहाच्या दुसर्‍या सत्रात गारपिटीच्या मुद्द्यावर चर्चेसाठी कामकाजात सहभागी होण्याचा निर्णय राष्ट्रवादीने घेतला. त्यानंतर आव्हाडांचं निलंबन मागे घेण्याची घोषणा करण्यात आली.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 15, 2014 04:18 PM IST

ताज्या बातम्या