सिडनीतील कॅफेमध्ये एक भारतीय नागरिकही ओलिस

सिडनीतील कॅफेमध्ये एक भारतीय नागरिकही ओलिस

  • Share this:

BRKING940_201412151303_940x355

15 डिसेंबर : ऑस्ट्रेलियातील सर्वात मोठे शहर असलेल्या सिडनीतील एका चॉकलेट आणि कॉफी कॅफेमध्ये सशस्त्र हल्लेखोराने सुमारे 50 जणांना ओलीस धरले आहेत. या 50 जणांनपैकी एका भारतीयाचाही समावेश असल्याची माहिती नगरविकासमंत्री व्यंकय्या नायडू यांनी दिली आहे. या ओलीसनाट्याने सिडनीत एकच घबराट पसरली आहे. हल्लेखोरांच्या कचाट्यातून केवळ पाच जणांणा निसटण्यात यशस्वी झाले असून बाकी सर्वांचे जीव धोक्यात आहेत.

तासांपासून परिस्थिती 'जैसे थे' च आहे'. सध्या पोलिसांनी संपूर्ण परिसराला घेरलं असून पोलिसांकडून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. एका बंदुकधार्‍याशी संपर्क करण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आलं आहे. या दहशतवाद्यांनी ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांसोबत चर्चा करण्याची मागणी केली आहे. तसंच, आयसिसचा झेंडा देण्याचीही त्यांनी मागणी केली जाते आहे. त्यामुळे कॅफे ताब्यात घेण्यामागे 'आयसिस'चा हात असल्याची शक्याता व्यक्त केली जाते आहे. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान टोनी ऍबॉट यांनी नागरिकांना शांततेचे आवाहन केले आहे. ओलिस ठेवलेल्यांमध्ये कॅफेतील दहा कर्मचार्‍यांचा समावेश आहे.

ऑस्ट्रेलियातील वृत्तवाहिन्यांच्या फुटेजनुसार काहीजण खिडकीवर हात आपटताना दिसत आहेत. विशेष अधिकारी कॉफी शॉपमध्ये असलेल्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असल्याचे कळते. लोकांना ओलिस ठेवणार्‍या या दहशतवाद्यांनी कॅफेच्या खिडकीच्या बाहेर काळे झेंडे दाखवले. या झेंड्यांवर अरबी भाषेत लिहलेलं असल्यानं ते दहशतवादी असल्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे.

या कॅफेजवळील इमारती मोकळ्या करण्यात आल्या आहेत. तसेच सिडनीतील प्रसिद्ध ओपेरा हाऊसही मोकळे करण्यात आले आहे. या हल्ल्याबाबत मी राष्ट्रीय सुरक्षा समितीकडून सतत माहिती घेत आहे. ऑस्ट्रेलियातील नागरिकांनी घाबरून न जाता आपले दैनंदिन कामकाज सुरू ठेवावे. हा हल्ला खूप धक्कादायक घटना असून, आम्ही नागरिकांच्या सुटकेसाठी प्रयत्न करत आहोत, असे ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान टोनी ऍबॉट यांनी सांगितले.

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 15, 2014 01:59 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...