S M L

निसर्ग कोपला, 38 हजार एकर शेती 'गार'

Sachin Salve | Updated On: Dec 13, 2014 10:58 PM IST

निसर्ग कोपला, 38 हजार एकर शेती 'गार'

13 डिसेंबर : गेले 2 दिवस पडलेल्या अवकाळी पावसाच्या तडाख्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी हवालदिल झालाय. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झालंय. द्राक्षं, डाळिंब, बोर आणि कांदा उत्पादकांचं कंबरडच मोडलंय. द्राक्षाच्या बागाच्या बागा आडव्या झाल्यात. गारपिटीमुळे नाशिक जिल्ह्यातलं 38 हजार एकर क्षेत्र बाधित झालंय. 362 गावांना याचा फटका बसलाय. नुकसानीचा आकडा कोट्यवधींच्या घरात जाण्याची शक्यता आहे. आणखी दोन दिवस गारपीट होणार असा अंदाज हवानमान खात्याने व्यक्त केलाय.

वर्ष सरतंय पण बळीराजाचा संकटांनी काही पाठलाग सोडलेला नाही. अवकाळी पाऊस, दुष्काळ, पाणीटंचाईने अगोदरच त्रस्त शेतकर्‍यांना गारपिटीने पुन्हा एकदा झोडपून काढले. उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने पुन्हा एकदा बळीराजाच्या डोळ्यात पाणी आणलंय. अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतकर्‍यांची उभी पिकं जमीनदोस्त केलीये. दोन दिवसांपूर्वी अक्षरश: लिंबाएवढ्या गारा पडल्यात. या गारपिटीच्या तडाख्यात 20 शेतमजूर जखमी झाले तर बकर्‍या, कोंबड्या मृत्युमुखी पडल्यात. गारपिटीमुळे नाशिक जिल्ह्यात 20 हजार हेक्टर शेतीचं नुकसान झालंय. गारपिटीमुळे द्राक्ष, डाळिंब आणि कांदा पिकाचं मोठ्ठं नुकसान झालंय. नुकसानीचा आकडा कोट्यवधींच्या घरात जाण्याची शक्यता आहे. मनमाड, देवळामध्ये डाळिंब, निफाड आणि दिंडोरीमध्ये द्राक्ष तर सटाणा, चांदवड आणि नांदगावमध्ये कांद्याचं अतोनात नुकसान झालंय. येवला तालुक्यातल्या भाटगाव गायके वस्तीत गारपिटीमुळे मेंढ्या, बकर्‍या, कोंबड्या मृत्युमुखी पडल्यात. निफाडलाही गारपिटीचा फटका बसलाय. डाळिंबाच्या बागाही यात उद्धवस्त झाल्यात. मालेगाव आणि देवळा तालुक्यातल्या डाळिंब पिकाचं मोठं नुकसान झालंय. दहा हजार हेक्टरवरची डाळिंब सडली आहे. झाडावर तयार झालेला लाखोंचा माल गारांचा फटका लागल्यानं मातीमोल झालाय. दरम्यान, आज राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ, सहकार राज्यमंत्री दादा भुसे आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गारपीटग्रस्त भागाची पाहणी केली आणि गारपीटग्रस्तांची विचारपूस केली.


Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 13, 2014 09:53 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close