मराठवाड्याला पाणी मिळणारच !, कोर्टाने याचिका फेटाळली

मराठवाड्याला पाणी मिळणारच !, कोर्टाने याचिका फेटाळली

  • Share this:

sc_on_jaikwadi_dam12 डिसेंबर : दुष्काळग्रस्त मराठवाड्याला पाणी सोडण्यावरुन अहमदनगरकरांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. मात्र, सुप्रीम कोर्टाने आता याविरोधातली याचिका फेटाळून लावत मराठवाडावासियांना दिलासा दिला. सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाचा निर्णय कायम ठेवत मराठवाड्याला पाणी पोहचलेच पाहिजे असं शिक्कामोर्तब केलंय.

अहमदनगर जिल्ह्यातल्या मुळा आणि भंडारदरा धरणातून जायकवाडी धरणात पाणी सोडण्यात आलंय. पण आमच्या वाट्याचं पाणी मराठवाड्याला का दिलं जात याविरोधात अहमदरनगर जिल्ह्यातील शेतकरी आणि नेते रस्त्यावर उतरले होते. एवढंच नाहीतर हा वाद थेट सुप्रीम कोर्टात पोहचला. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या हरिश्चंद्र फेडरेशननं जायकवाडी धरणात पाणी सोडण्यास स्थगिती द्यावी अशी अपील सुप्रीम कोर्टात दाखल केली होती. मात्र ही याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली. तसंच यासंबंधीचा निर्णय हायकोर्टाने घ्यावा असंही सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलंय. विशेष म्हणजे दोनच दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाचा निर्णय कायम ठेवत पाणी सोडण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यास स्पष्ट नकार दिला होता. कोर्टाच्या या निर्णयामुळे मराठवाड्यातल्या जनतेला काहीसा दिलासा मिळालाय. जायकवाडीला पाणी मिळावं की नाही यासंदर्भात आतापर्यंत 17 याचिका दाखल झाल्या आहेत.

Follow @ibnlokmattv

First published: December 12, 2014, 8:25 PM IST

ताज्या बातम्या