S M L

'ते' पाच अतिरेकी जळगावात होते वास्तव्यास !

Sachin Salve | Updated On: Dec 12, 2014 11:30 PM IST

'ते' पाच अतिरेकी जळगावात होते वास्तव्यास !

12 डिसेंबर : मध्य प्रदेशात खंडवा जेलमधून पळालेले सिमी संघटनेचे पाच अतिरेकी जळगाव जिल्ह्यात वास्तव्यास होते अशी धक्कादायक बाब आता समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वेच्या भुसावळ विभागात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याच प्रमाणे भुसावळसह जळगाव, नाशिकरोड, मनमाड, खंडवा, अकोला, शेगाव, मलकापूर आदी महत्त्वाच्या रेल्वे स्टेशनवर बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

मध्य प्रदेशातील भोपाळच्या खंडवा जेलमधून पळालेले सिमी संघटनेचे पाच अतिरेकी देशभरात महाराष्ट्रसह चार राज्यात दहशतवादी हल्ले करू शकता अशी माहिती भारतीय गुप्तचर खात्याने दिली होती. त्यामुळे देशभरात हायअलर्ट जारी करण्यात आलाय. धक्कादायक म्हणजे हे पाचही अतिरेकी जळगाव जिल्ह्यात वास्तव्यास होते, ही बाब समोर आली आहे. यातील एका अतिरेक्याचा मामा मुक्ताईनगर येथे राहत असून तो मामाकडे आल्याच्या संशयावरून भोपाळ येथील दहशतवाद विरोधी(एटीएस)पथक तपासणीसाठी मुक्ताईनगरला येऊन गेल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, यानंतर रेल्वेच्या भुसावळ विभागात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. देश विघातक कारवाया करणारे सिमी संघटनेचे मोहम्मद इजाजोद्दीन, झाकीर हुसेन, अमजद खान, गुड्डू ऊर्फ शेख मेहबूब आणि मोहम्मद असलम खान हे खंडवा कारागृहातून 2013 मध्ये फरार झाले होते. त्या वेळी ते पाचही जण जळगावमार्गे औरंगाबादकडे गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यापैकी गुड्डू ऊर्फ शेख मेहबूब याचा मामा मुक्ताईनगर येथे राहतो. त्याच्याकडे तो आल्याची माहिती एटीएसला मिळाली होती. त्या आधारे पथक तपासणीसाठी येऊन गेले. या पथकाच्या तपासणीनंतर रेल्वेच्या भुसावळ विभागात हायअलर्ट जारी करण्यात आले आहे. भुसावळसह जळगाव, नाशिकरोड, मनमाड, खंडवा, अकोला, शेगाव, मलकापूर आदी महत्त्वाच्या रेल्वेस्थानकांवर बंदोबस्त वाढवण्यात आला असल्याची माहिती आरपीएफचे आयुक्त चंद्रमोहन मिश्र यांनी दिली.

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 12, 2014 07:13 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close