हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत जितेंद्र आव्हाड निलंबित

हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत जितेंद्र आव्हाड निलंबित

  • Share this:

Jitendra avhad

12  डिसेंबर :   सभागृहात गोंधळ घालून अपशब्द वापरल्याचा ठपका ठेवत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना आज (शुक्रवारी) हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आलं आहे. विधीमंडळ कामकाजमंत्री गिरीश बापट यांनी आव्हाड यांच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडला. त्याला सत्ताधारी बाकांवरील आमदारांनी पाठिंबा दिला.

विधानसभेमध्ये प्रश्नोत्तराचा तासावेळी जितेंद्र आव्हाड यांनी अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत जमून शेतकर्‍यांना देण्यात येणार्‍या पॅकेजवरून गोंधळ घातला. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी यावेळी केलेल्या घोषणाबाजीमुळे सभागृहाचे कामकाज 15 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले. त्यानंतर पुन्हा कामकाज सुरू झाल्यावरही आव्हाड आणि विरोधकांचा गोंधळ सुरूच होता. आव्हाड अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेतूनच सरकारवर टीका करीत होते. त्यानंतर मंत्र्यांबद्दल अपशब्द उद्गारल्याबद्दल जितेंद्र आव्हाड यांना निलंबित करण्यात आलं आहे.

Follow @ibnlokmattv

First published: December 12, 2014, 2:19 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading