Elec-widget

उत्तर महाराष्ट्रात पुन्हा गारांचा तडाखा

उत्तर महाराष्ट्रात पुन्हा गारांचा तडाखा

  • Share this:

Satara Gara

12 डिसेंबर :  अवकाळी पाऊस, गारपीट यासारख्या नैसर्गिक संकटांचा सामना करणार्‍या शेतकर्‍यांना आता कुठे सरकारकडून काहीसा दिलासा मिळत असतानाच उत्तर महाराष्ट्रात पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.

सातारा जिल्ह्यात अवकाळी पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली आहे, तर निफाडमध्ये चक्क गारांचा पाऊस पडला आहे. त्यामुळे पिकांच्या नुकसानीनं शेतकरी धस्तावला आहे.

थंड वारे घेऊन येणारे वेस्टर्न डिस्टर्बन्स आणि ईशान्येकडून येणार्‍या बाष्पयुक्त वार्‍यामुळं मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता असल्याचा अंदाज वेधशाळेनं व्यक्त केला आहे. या वार्‍यामुळं राज्यातल्या अनेक भागात ढगाळ वातावरण आहे.

पुढच्या काही दिवसांमध्ये असंच वातावरण राहण्याची शक्यताही हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 12, 2014 09:28 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...