वादाच्या नाट्यावर पडदा, मोहन जोशींनी व्यक्त केली दिलगिरी

वादाच्या नाट्यावर पडदा, मोहन जोशींनी व्यक्त केली दिलगिरी

  • Share this:

mohan_joshi11 डिसेंबर : 'हे कलावंतांचं संमेलन आहे, इथं सीमाभागाचा प्रश्न मांडणार नाही' अशी अजब भूमिका घेणारे मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांनी अखेर या नाट्यावर पडदा टाकलाय. संमेलन बेळगावमध्येच होईल असं सांगत त्यांनी जाहीरपणे दिलगिरी व्यक्त केलीये.

बेळगावमध्ये होणारं नाट्यसंमेलन चांगलच वादात अडकलं होतं. सीमाप्रश्नाचा ठराव बेळगाव नाट्य संमेलनात मांडणार नाही, हे कलावंतांचं संमेलन आहे, त्यामुळे हा विषय त्या व्यासपीठावर मांडता येणार नाही. सीमाप्रश्नाबद्दल आम्हाला काय वाटते ते दाखविण्याची नाट्य संमेलन ही जागा नाही. बेळगाव प्रश्नाबद्दल तळमळ आणि कळकळ दाखवणं हे माझं काम नाही असा अजब सूर नाट्य संमेलनाचे अध्यक्ष मोहन जोशींना लगावला होता. जोशींच्या वक्तव्यामुळे चांगलाच वाद पेटला. आज बेळगाव नाट्य परिषदेच्या ऑफिससमोर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली. या बैठकीत तीन ठराव मांडण्यात आले. बेळगाव नाट्यपरिषद मोहन जोशींच्या वक्तव्याशी सहमत नाही. 6 ते 8 फेब्रुवारी दरम्यान नाट्यसंमेलन घेणं शक्य नाही. मोहन जोशींनी सीमाभागातल्या जनतेची माफी मागावी, असे हे ठराव करण्यात आले. पण अखेर मोहन जोशी यांनी आपली चूक सुधारत संमेलन बेळगावमध्येच होईल. सीमाभागाबद्दल माझ्या विधानाचा विपर्यास केला. पण तरीही ज्यांचा गैरसमज झाला असेल त्यांची माफी मागतो असं सांगून जोशींनी सारवासारव केली. तसंच ज्या राज्यात संमेलन आहे त्या राज्याच्या प्रतिनिधींना निमंत्रण देणं क्रमप्राप्त असतं तसं मी द्यायला गेलेलो होतो, असंही जोशींनी म्हटलंय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 11, 2014 08:00 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading