S M L

सरकार अधिवेशनात दंग, नांदेडमध्ये 2 दिवसांत 3 शेतकर्‍यांचा आत्महत्या

Sachin Salve | Updated On: Dec 9, 2014 04:22 PM IST

सरकार अधिवेशनात दंग, नांदेडमध्ये 2 दिवसांत 3 शेतकर्‍यांचा आत्महत्या

09 डिसेंबर : एकीकडे राज्य सरकारचं हिवाळी अधिवेशन नागपुरात भरलंय. दुष्काळग्रस्त गावातील प्रश्नावरुन विधानभवनात विरोधांनी सरकारला धारेवर धरलंय. पण दुसरीकडे मराठवाड्यात आत्महत्येचं सत्र सुरूच आहे. नांदेड जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांत 3 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या.

नांदेड जिल्ह्यात अर्धापूर तालुक्यातील कोंढा येथील शिवाजी कदम या 45 वर्षीय शेतकर्‍यांनं शेतात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. आपल्या 3एकर शेतीत त्यांनी कापुस आणि सोयाबीन घेतले होते. पण पावसाअभावी पिकं आली नाहीत. पेरणीसाठी त्यंनी खाजगी कर्ज घेतले होते. नापिकी आणि कर्जामुळे त्यांनी आत्महत्या केली. दुसर्‍या घटनेत बिलोली तालुक्यातल्या आदमपूर इथल्या 27 वर्षीय तरुण शेतकरी मसना येतोंड़े यानी शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. आज सकाळी ही घटना उघडकीस आली. येतोंडे यांना केवळ 2 एकर शेती होती. शेतीत त्यांनी 2 वेळा बोअर मारला होता. पण दोन्ही वेळी पाणी लागले नाही. अत्यल्प पावसामुळे कुठलेही पीक आले नाही. त्यातून त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. तर रविवारी संध्याकाळी हदगाव तालुक्यातल्या चिकाळा इथल्या दिगंबर मेकाले या 45 वर्षीय शेतकर्‍यानं विष पिऊन आत्महत्या केली. नापिकी आणि कर्जामुळे त्यांनी विष पिऊन आत्महत्या केली. तर दुसरीकडे उस्मानाबाद जिल्ह्यात आणखी एका शेतकर्‍यानं आत्महत्या केलीये. 76 वर्षांच्या नरसिंग लिंबाजी शहापुरेंनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केलीये. उमरगा तालुक्यातील माडज गावात ही घटना घडली. नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केलीये.

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 9, 2014 04:22 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close