पाकला धूळ चारत भारताने जिंकला अंधांचा वर्ल्ड कप !

पाकला धूळ चारत भारताने जिंकला अंधांचा वर्ल्ड कप !

  • Share this:

india win blind world cup08 डिसेंबर : अंध क्रिकेट वर्ल्ड कप जिंकून दृष्टीहीन क्रिकेटरनी भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवलाय. दक्षिण आफ्रिकेत झालेल्या अंधांच्या वर्ल्ड कपमध्ये भारतच्या अंध क्रिकेट टीमने पाकिस्तानचा पराभव करत वर्ल्ड कपला गवसणी घातलीये.

दक्षिण आफ्रिकेत केपटाऊनमध्ये अंधांचा वर्ल्ड कप पार पडला. भारताने उपांत्य फेरीत श्रीलंकेला नमवून अंतिम फेरीत धडक मारली होती. अंतिम सामन्यात भारताची गाठ पडली ती कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी. पाकिस्तानने यापूर्वी 2 वेळेस वर्ल्ड कप जिंकलाय. त्यामुळे भारतापुढे वर्ल्ड कप जिंकण्याची आणि पराभवाचा वचपा काढण्याची संधी चालून आली होती. अखेरीस भारतीय जिगरबाज खेळाडूंनी संधीचं सोनं करत पाकला धूळ चारली आणि वर्ल्ड कपवर भारताचं नावं कोरलं. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करून 7 विकेटच्या बदल्यात 40 ओव्हरमध्ये 389 धावांचा डोंगर उभा केला. पाकने दिलेलं आव्हानाचा खुर्दा पाडत भारताने 39.4 ओव्हरमध्ये 5 विकेटच्या बदल्यात 392 धावा ठोकल्यात आणि जगज्जेते होण्याचं स्वप्न साकारलं. पाकने सलग दोन वेळा जगज्जेता होण्याचा मान पटकावला होता पण यंदा पहिल्यांदाच भारताने पाकच्या साम्राज्याचा खालसा करत जगज्जेतेपद पटकावले आहेत.

Follow @ibnlokmattv

First published: December 8, 2014, 3:57 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading