ISL सोबत बच्चेकंपनीचा दे दणादण गोल...

ISL सोबत बच्चेकंपनीचा दे दणादण गोल...

  • Share this:

B4O18slCYAAYsIZ07 डिसेंबर : इंडियन सुपर लीग आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. आएसएलने आज आणखी एक पाऊल टाकत नव्या दमाचा खेळाडूंना प्रशिक्षण देण्यासाठी पुढाकार घेतलाय. मुंबईत या नव्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी यंग चॅम्पियन्स स्पर्धा भरवण्यात आली होती. यावेळी फुटबॉल स्पोर्ट्स डेव्हलपमेंट लिमिटेडच्या संस्थापक आणि अध्यक्ष नीता अंबानी यांच्यासह अभिनेता सलमान खानही उपस्थित होता. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून फुटबॉल जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

इंडियन सुपर लीगच्या रुपाने भारताला फुटबॉल सारख्या खेळाला मोठे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. देशभरात फुटबॉलचा प्रसार व्हावा यासाठी  रिलायन्स फाऊंडेशनच्या चेअरमन नीता अंबानी यांनी पुढाकार घेतला. 12 ऑक्टोबर रोजी आयसीएल अर्थात इंडियन सुपर लीगचा श्रीगणेशा करण्यात आलाय. आयसीएलच्या या भरारीत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, अभिनेता रणबीर कपूर आणि जॉन अब्राहम यांनीही सहभाग नोंदवून ग्लॅमर मिळवून दिले. या स्पर्धेत आंतराष्ट्रीय खेळाडूंचा सहभाग हा महत्वाचा ठरला. भारतीय फुटबॉल खेळाडूंना आंतराष्ट्रीय खेळाडूंसोबत खेळण्याची नामी संधी प्राप्त झाली. याचाच एक भाग म्हणून आज मुंबईत खास बच्चेकंपनीसाठी यंग चॅम्पियन्स सामना भरवण्यात आला. दोन मुलांच्या चार टीम यात सहभागी झाल्या होत्या. 22.5 मिनिटांचे दोन सामने खेळवण्यात आले. पहिली मॅच स्लम सॉकर आणि मॅजिक बस इंडिया फाऊंडेशन या टीममध्ये झाला. तर दुसरा सामना युवा इंडिया आणि युवा इंडिया बी या टीममध्ये झाला. या बच्चेकंपनींना प्रोत्साहन देण्यासाठी फुटबॉल स्पोर्ट्स डेव्हलपमेंट लिमिटेडच्या संस्थापक आणि अध्यक्ष नीता अंबानी यांच्यासह अभिनेता सलमान खान यांनी हजेरी लावली.

Follow @ibnlokmattv

First published: December 7, 2014, 5:45 PM IST

ताज्या बातम्या