ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार पुन्हा रुग्णालयात दाखल, प्रकृती स्थिर

ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार पुन्हा रुग्णालयात दाखल, प्रकृती स्थिर

  • Share this:

dilipkumar07 डिसेंबर : ख्यातनाम अभिनेते दिलीपकुमार यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. त्यांना न्यूमोनिया झाल्यानं ते रुग्णालयात दाखल आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिलीय. त्यांना लवकरच डिस्चार्ज देण्यात येईल, असंही डॉक्टरांकडून सांगण्यात आलंय.

मागील महिन्यातही दिलीपकुमार यांची प्रकृती बिघडल्यामुळे लीलावती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. पण पुन्हा एकदा न्यूमोनियाचा त्रास होऊ लागल्यामुळे दिलीपकुमार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहे काही दिवस त्यांचा रुग्णालयामध्ये मुक्काम असणार आहे.

Follow @ibnlokmattv

First published: December 7, 2014, 1:49 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading