पंतप्रधान मोदींच्या कामामुळे ओबामा प्रभावित

पंतप्रधान मोदींच्या कामामुळे ओबामा प्रभावित

  • Share this:

modi-obama_1_0_0_0_0_0_0_0 4 डिसेंबर : 'मोदींना मॅन ऑफ ऍक्शन' असा किताब देणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामावर स्तुतीसुमनं उधळली. अधिकार्‍यांनी अकार्यक्षमता संपवून नव्या जोमाने कामाला लागले पाहिजे या मोदींच्या वक्तव्याची ओबामांनी स्तुती केलीये.

देशातील बड्या उद्योगपतींच्या झालेल्या बैठकीत ''मोदींनी भारतातील नोकरशाहांच्या कार्यक्षमतेला वाव देण्यासाठी उचललेल्या पावलांमुळे मी प्रभावित झालो आहे'', असे मत ओबामांनी व्यक्त केलं. तसंच हे काम केवळ एका दिवसांत पूर्ण होणार नाही. या कामाला वेळ लागेलच. यांत ते किती यशस्वी होतात हे येणारा काळच ठरवेल, असे मतही त्यांनी व्यक्त केलं. येत्या 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष बराक ओबामा भारतात येणार आहेत. त्यामुळे ओबामांच्या या विधानाला महत्व प्राप्त झाले आहे.

Follow @ibnlokmattv

First published: December 4, 2014, 5:57 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading