जवखेड हत्याकांड प्रकरणी अखेर एकाला अटक

जवखेड हत्याकांड प्रकरणी अखेर एकाला अटक

  • Share this:

javkheda_arrest04 डिसेंबर : अखेर जवखेड हत्याकांड प्रकरणी एका जणाला अटक करण्यात पोलिसांनी यश मिळालंय. प्रशांत जाधव असं या आरोपीच नाव आहे. बुधवारी रात्री पोलिसांनी अटकेची कारवाई केली. त्यामुळे या प्रकरणाचं गुढ उकलण्याची शक्यता आहे.

21 ऑक्टोबर रोजी अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील जवखेड गावात संजय जाधव कुटुंबियांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडाने महाराष्ट्राला एकच हादरा बसला होता. या हत्येप्रकरणातील आरोपी अटक करण्यात यावी यासाठी मुंबईपासून न्यूयॉर्कपर्यंत अनेक संघटनांनी तीव्र निदर्शनं केली. पोलिसांनी या प्रकरणी कमालीची गोपनियता बाळगूण तपास सुरू ठेवला होता. अखेरीस बुधवारी रात्री पोलिसांनी प्रशांत जाधवच्या घरी झाडाझडती घेतली असता. शस्त्र आणि रक्ताने माखलेले कपडे सापडले. त्याआधारावर पोलिसांनी प्रशांतला ताब्यात घेतलं. प्रशांत हा मयत संजय जाधव यांचा पुतण्या आहे. त्यानेच पोलिसांत तक्रार दिली होती. पोलिसांनी अगोदर संशयित म्हणून त्याची चौकशीही केली होती. अखेरीस अटकेनंतर प्रशांतची लाय डिटेक्टर टेस्ट घेण्यात आली त्यात तो पॉझिटिव्ह आढळला. लाय डिटेक्टर टेस्टचा रिपोर्ट आणि झडतीमध्ये सापडलेल्या मुद्देमाल याच्या आधारावर अटक करण्यात आलीय.

जवखेड हत्याकांडानंतर गेली 45 दिवस पोलिसांच्या 7 पथकानं तपास केला. यातल्या 10 साक्षीदारांच्या 3 टेस्ट घेण्यात आल्या. त्यातल्या 9 जणांच्या टेस्ट निगेटीव्ह आल्या. तर संशयित प्रशांतच्या तिन्ही टेस्ट पॉझिटिव्ह आल्या होत्या. प्रशांत हा मयत संजयचा पुतण्या आहे. या हत्याकांडाचा फिर्यादीही तोच आहे.

जवखेड हत्याकांडाचा घटनाक्रम

20 ऑक्टो - तिहेरी खून

21 ऑक्टो - FIR दाखल

22 ऑक्टो - पोस्टमॉर्टेम रिपोर्ट

23 ऑक्टो - दलित अत्याचारविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

24 ऑक्टो - संशयितांचे जबाब सुरू

26 ऑक्टो - पाथर्डी बंद, प्रकाश आंबेडकर यांची भेट

27 ऑक्टो - आरपीआयचा मोर्चा आणि अजित पवारांची भेट

28 ऑक्टो - 100 संशयितांची चौकशी

01 नोव्हें - राज ठाकरे, भालचंद्र मुणगेकरांनी दिली भेट

2 नोव्हें - पंकजा मुंडे यांनी नार्को टेस्टची घोषणा केली

3 नोव्हें - नाशिकमध्ये सर्वपक्षीय मोर्चा

4 नोव्हें - 250 जणांचे जबाब पूर्ण, सुगावा मात्र नाही

7 नोव्हें - मधुकर पिचड यांची भेट

8 नोव्हें - साक्षीदारांच्या नार्को टेस्टसाठी कोर्टाकडे परवानगी अर्ज

10 नोव्हें - साक्षीगदारांच्या नार्कोला कोर्टाची परवानगी

10 नोव्हें - विद्या चव्हाण यांचे धरणे

11 नोव्हें - अण्णा हजारे यांची भेट

15 नोव्हें - MIM नेते ओवैसी यांची भेट

11 नोव्हें - पोलिसांनी घेतली ब्रेन मॅपिंग टेस्ट

22 नोव्हें - आणखी काही साक्षीदारांची ब्रेन मॅपिंग टेस्ट

28 नोव्हें - प्रशांतसह इतर साक्षीदारांची ब्रेन मॅपिंग टेस्ट

3 डिसें - जवखेड्यातल्या प्रशांत जाधवच्या घराची झडती, आक्षेपार्ह वस्तू जप्त

3 डिसें- संशयित आरोपी प्रशांत जाधव अटकेत

Follow @ibnlokmattv

First published: December 4, 2014, 1:13 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading