काँग्रेसचे नेते संपर्कात, खडसेंचं सेनेवर दबावतंत्र ?

  • Share this:

khadase_sot29 नोव्हेंबर : एकीकडे भाजपने शिवसेनेला सोबत घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे तर दुसरीकडे भाजपचे नेते महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी सेनेलाच इशारा दिलाय. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे काही आमदार आपल्या संपर्कात असून भाजपला मतदान करण्यास तयार आहे असा दावाच खडसेंनी केलाय. ते जळगावमध्ये बोलत होते.

हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर भाजपने शिवसेनेला सोबत घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. ठरल्याप्रमाणे शुक्रवारपासून भाजपचे नेते धर्मेंद्र प्रधान आणि चंद्रकांत पाटील यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा केली. तर आज भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी 'मातोश्री'वर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. तर दुसरीकडे भाजपचे फायरब्रँड नेते एकनाथ खडसे यांनी शिवसेनेवर दबावतंत्राचा वापर केलाय. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे काही आमदार आपल्या संपर्कात आहे. ते भाजपच्या बाजूने मतदान करण्यासाठीही तयार आहे असा दावाच खडसेंनी केला. या अगोदरही खडसेंनी काँग्रेसचे आमदार संपर्कात असल्याचा दावा केला होता. विशेष म्हणजे युती तुटण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी खडसे यांनाच जबाबदार धरलं होतं.

Follow @ibnlokmattv

First published: November 29, 2014, 5:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading