आक्षेपार्ह संतसाहित्यावर बंदी घालण्याची वारक-यांची मागणी

29 जून हिंदू देव-देवता तसंच संतांविषयी प्रसिद्ध झालेल्या आक्षेपार्ह साहित्यावर शासनाने बंदी घालावी, अशी मागणी वारकरी फडकर दिंडीकरी समाज संघटना आणि संत ज्ञानेश्‍वर माहाराज पालखी सोहळ्यातील मानकरींनी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे केली आहे. वारकरी फडकरी दिंडीकरी समाज संघटना आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील प्रमुख मानाच्या दिंड्या यांची माळशिरस इथे बैठक झाली. त्या बैठकीत संत साहित्याबाबत कायदा करावा अशी मागणी करण्यात आली. शासनाने काही ठोस निर्णय दिला नाही तर वारक-यांच्या पालख्यांनी वाखरीत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. या प्रकरणी वारकरी फडकर दिंडीकरी समाज संघटना आणि संत ज्ञानेश्‍वर माहाराज पालखी सोहळ्यातले मानकरी वारकरी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची भेट घेणार आहेत.

  • Share this:

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 29, 2009 11:46 AM IST

ताज्या बातम्या