भाजपकडून बोलणी पूर्ण, आता सेनेची बारी !

  • Share this:

cm on uddhav29 नोव्हेंबर : शिवसेना सत्तेत सहभागी होणार का याबाबत शुक्रवारी झालेल्या बैठकीनंतर आज(शनिवारी) दुपारनंतर महत्त्वपूर्ण घडामोडी होण्याची शक्यता आहे. भाजपच्या वतीनं संपूर्ण बोलणी पूर्ण झाली असून आता शिवसेनेला निर्णय घ्यायचा आहे.

भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. स्वामी यांच्या भेटीमुळे बैठकीला महत्वप्राप्त झालंय. त्यामुळे आज शिवसेनेकडून काय प्रतिक्रिया येतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

शुक्रवारी रात्री उशिरा सह्याद्री अतिथिगृहावर झालेल्या सेना-भाजपच्या बैठकीमध्ये पुन्हा एकदा चर्चा झालीये. सेनेचे नेते अनिल देसाई, सुभाष देसाई आणि अनंत गीते यांनी भाजप नेते धर्मेंद्र प्रधानांशी सह्याद्रीवर चर्चा केली.

त्यानंतर अनिल देसाई आणि सुभाष देसाईंनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंना माहिती दिली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिवसेना 10 मंत्रिपदांच्या मागणीवर ठाम आहे. सेनेला 6 कॅबिनेट तर 4 राज्यमंत्रिपदं हवी आहेत. तर अनिल देसाईंची केंद्रात स्वतंत्र कार्यभार असलेल्या मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे.

Follow @ibnlokmattv

First published: November 29, 2014, 2:13 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading