अमरावतीत तरुण शेतकर्‍याची आत्महत्या

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Nov 28, 2014 01:39 PM IST

Image img_149012_farmarsusud_240x180.jpg28 नोव्हेंबर : आत्महत्याग्रस्त अमरावती जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र अजुनही सुरूच यंदा उशिरा आलेल्या पावसाने सोयाबीन, तूर शेतकर्‍यांच्या हातातून गेल्याने हवालदिल झाला आहे. अमरावती जिल्ह्यातील चांदुर बाजार तालुक्यातील जालनापूर या गावात नापिक शेतीमुळे एका 24 वर्षी शेतकर्‍यांने आत्महत्या केलीये.

जालनापूर येथील आशिष रमेश घाटोळ असं या शेतकर्‍याचं नाव आहे. यावर्षी 3 एकरामध्ये 20 ते 25 क्विंटल सोयाबीन उत्पन्नाची अपेक्षा असताना केवळ 3 क्विंटल सोयाबीन झाले, 40 ते 50 हजार रुपये खर्च केल्यावर केवळ 10 हजारच उत्पन्न झाल्यामुळे गेल्या 8 दिवसापासून आशिष चिंतेत होता. तसंच त्याच्यावर चांदुर येथील सावकाराचे कर्जही आहे. कर्ज कसे फेडावे याच विंवचनेत आशिष यांनी 24 ला सकाळी फवारणी करायला शेतावर गेला. त्यावेळी त्याचा लहान भाऊ सोबत होता. लहान भावाला घरी पाठवून आशिषने शेतातच विष पिऊन आत्महत्या केली. त्याला तातडीने रुग्णालयात नेत असतांनाच वाटेतच आशिष ची प्राणज्योत मालवली.

अमरावती विभागात आत्महत्या

- गेल्या 6 महिन्यात 448 शेतकर्‍यांच्या आत्महत्या

- एकट्या ऑक्टोबरमध्ये 94 शेतकर्‍यांनी संपवलं जीवन

Loading...

- नोव्हेंबर महिन्यात आतापर्यंत 43 शेतकर्‍यांच्या आत्महत्या

- 14 वर्षात 10,770 शेतकर्‍यांनी केल्या आत्महत्या

- यापैकी 4,145 आत्महत्या ठरल्या पात्र

- 6,500 आत्महत्या ठरवल्या अपात्र

- 125 आत्महत्यांची प्रकरणं मदतीसाठी प्रलंबित

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 28, 2014 12:34 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...