28 नोव्हेंबर : सत्तेत सहभागासाठी भाजपने अखेर शिवसेनेचं दार ठोठावलंय. शिवसेनेनं सत्तेत सहभागी व्हावं अशी इच्छा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलून दाखवली आणि शुक्रवारपासून सेनेसोबत चर्चा करणार असं जाहीर केलं. त्यानुसार आज भाजपचे नेते 'मातोश्री'वर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजपासून शिवसेनेशी चर्चा सुरू करणार असल्याचं सांगितलं. त्यानंतर शिवसेना-भाजपमधल्या घडमोडींना वेग आलाय. आज शिवसेना आणि भाजप नेत्यांमध्ये महत्त्वाची बैठक होणार आहे. शिवसेना राज्यात सरकारसोबत जाण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला नेमकी कोणती कॅबिनेट आणि राज्यमंत्रीपदं द्यायची, नेमकी कोणती खाती द्यायची याबाबत चर्चा होणार आहे. संध्याकाळी 6 वाजता 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ही बैठक होईल. भाजपकडून पेट्रोलियम राज्यमंत्री धर्मेंद्र प्रधान आणि सहकारमंत्री चंद्रकांत पाटील या बैठकीला उपस्थित राहतील. त्यापूर्वी धर्मेंद्र प्रधान मुंबईत आल्यानंतर संध्याकाळी भाजपची अंतर्गत बैठक होईल. यात शिवसेनेला देण्यात येणार्या मंत्रिपदांविषयी चर्चा होईल. त्यानंतर 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंसोबत चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल.
Follow @ibnlokmattv |
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा