कोर्टाची फटकेबाजी ; सासरे, जावई 'क्लिन बोल्ड' !

कोर्टाची फटकेबाजी ; सासरे, जावई 'क्लिन बोल्ड' !

  • Share this:

n srinivasan and gurunath meiyappan27 नोव्हेंबर : बहुचर्चित आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी आज सुप्रीम कोर्टाने बीसीसीआयला चांगलेच फटकारले असून मैदानाबाहेरचे सूत्रधार असलेले सासरे जावई क्लिन बोल्ड झाले आहे. एन.श्रीनिवासन यांना बीसीसीआय अध्यक्षपदाची निवडणूक लढवता येणार नाही असा दणका कोर्टाने दिलाय. तसंच चेन्नई सुपर किंग्जला आयपीएलमधून बाद ठरवण्यात यावे असे आदेशही कोर्टाने दिले आहे.

आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी आज सुप्रीम कोर्टाने सुनावणी झाली यावेळी सुप्रीम कोर्टाने एन. श्रीनिवासन आणि चेन्नई सुपर किंग्जला चांगलाच झटका दिला. स्पॉट फिक्सिंगमध्ये ज्यांच्यावर ठपका आहे त्यांना बीसीसीआयच्या निवडणुकीपासून बाजूला ठेवावं, असे स्पष्ट आदेश कोर्टाने दिले आहेत. त्यामुळे श्रीनिवासन यांचे पुन्हा निवडणूक लढवण्याचे प्रयत्न अयशस्वी होणार आहेत. कोर्टाच्या आदेशामुळे चेन्नई सुपर किंग्जचं आयपीएलमधलं भवितव्यही धोक्यात आलंय. आयपीएलच्या नियमावली 11.3 नुसार कोणत्याही टीमचा मालक हा गैरप्रकारात आढळला तर त्याची टीम बाद ठरवण्यात यावी असा अध्यादेश आहे. चेन्नईचा मालक गुरुनाथ मय्यपन स्पॉट फिक्सिंग प्रकरणात बेटिंग लावत असल्याचं निर्देशनास आलंय त्यामुळे चेन्नई टीम अपात्र ठरवण्यात यावी असे आदेश कोर्टाने दिले आहे. कोर्टाच्या या निर्णयाने श्रीनिवासन आणि त्यांचा जावई मय्यपनचा डाव आता मोडीत निघण्यात जमा झाला आहे.

Follow @ibnlokmattv

First published: November 27, 2014, 2:41 PM IST

ताज्या बातम्या