26/11 हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली

26/11 हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली

  • Share this:

mumbai_2611_shradanjali26 नोव्हेंबर : मुंबईवर झालेल्या 26/ 11च्या भीषण दहशतवादी हल्ल्याला आज 6 वर्षं पूर्ण होत आहे. पण या 6 वर्षांत बदललं काय, या प्रश्नाचं उत्तर नाही असंच आहे. या हल्ल्याच्या जखमा अजूनही ताज्याच आहेत. या हल्यात शहिद झालेल्या पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना मरिन ड्राईव्ह इथल्या पोलीस जिमखानावर श्रद्धांजली वाहण्यात आली.

यासाठी शहीद अधिकारी, कर्माचार्‍यांचे नातेवाईक हजर होते. शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, पोलीस महासंचालक संजीव दयाळ, मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनीही याठिकाणी शहिदांनी श्रद्धांजली वाहिली.

गेट वे ऑफ इंडियावरचं हॉटेल ताजमहाल या हल्ल्याचा बळी ठरलं होतं. शहिदांच्या श्रद्धांजली वाहण्यासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. गेट वे ऑफ इंडियावर मुलांनी रॅली काढली.

Follow @ibnlokmattv

First published: November 26, 2014, 11:11 AM IST

ताज्या बातम्या