आणखी एक कर्जाचा बळी, मालेगावात शेतकर्‍याची आत्महत्या

आणखी एक कर्जाचा बळी, मालेगावात शेतकर्‍याची आत्महत्या

  • Share this:

malegaon_farmarer25 नोव्हेंबर : कर्जबारीपणामुळे शेतकर्‍यांचं आत्महत्येचं सत्र सुरूच आहे. मालेगाव तालुक्यातील गिलनेगावमध्ये राहणारा अल्पभूधारक शेतकरी विठ्ठल अहिरे या कर्जबाजरी शेतकर्‍यानं आपल्या राहत्या घरी विषारी औषध पिऊन आत्महत्या केलीये.

अहिरे यांनी तीन वर्षापूर्वी एनडीसी बँकेकडून फार्म हाऊससाठी चार लाखांचं कर्ज घेतलं होतं, पण सलग दोन तीन वर्षांपासून निसर्गाच्या अवकृपेमुळे त्यांच्या हाती पीक आलंच नाही. त्यामुळे बँकेचा हफ्ता भरता आला नाही.

बँकेचा ससेमिरा वाढल्याने वैफल्यग्रस्त झालेल्या अहिरे यांनी शेतातील आयुष्य संपवलंय. विठ्ठल अहिरे हे घरातील एकमेव कमावती व्यक्ती होते. त्यांच्या पाठीमागे लहान भाऊ, आई,पत्नी आणि एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 25, 2014 09:26 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading