मुरबाड-म्हसा मार्गावर सिलेंडर स्फोटात ट्रक जळून खाक

मुरबाड-म्हसा मार्गावर सिलेंडर स्फोटात ट्रक जळून खाक

  • Share this:

murbad_mahasa_blast24 नोव्हेंबर : मुरबाड-म्हसा मार्गावरील बाटलीची वाडीजवळ एक एलपीजी गॅस सिलेंडर मालवाहू ट्रकमध्ये सिलेंडरचा स्फोट झाला. या सिलेंडरच्या स्फोटानंतर ट्रकने पेट घेतला असून जळून खाक झालाय. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 8 गाड्या रवाना पोहोचल्या असून आग आटोक्यात आलीये.

अलिबागवरुन मुरबाड येथील अंजली गॅस एजन्सीला सिलेंडर पुरवठा करण्यासाठी रवाना झाला होता. मात्र, मुरबाड गावाचा वीज पुरवठा खंडीत होता. त्यामुळे गाडीच्या केबिनमधील ड्रायव्हर आणि क्लिनरने आग पेटवण्याचा प्रयत्न केला. पण अचानक आगीने भडका घेतला. ती आग विझवण्यासाठी पाणी घेण्यास ड्रायव्हर आणि क्लिनर वस्तीत गेले असता गाडीने पेट घेतला आणि सिलेंडरचे स्फोट झाले. मुरबाडपासून म्हसा-कर्जत रोडवर 12 किमीअंतरावरही घटना घडली. ट्रकचा पूर्ण जळून कोळसा झालाय. गाडीत 300 सिलेंडर होते. आग आटोक्यात आलीये. सिलेंडर बाजूला गोळा करण्याचे काम सुरू आहे. आत्तापर्यंत 100 सिलेंडर मिळालेत. अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार 25ते 30 सिलेंडर्सचा स्फोट झाल्याय. स्फोटाची तीव्रता इतकी भीषण होती की, घटनास्थळापासून जवळ असलेल्या घरांना हादरे बसले आणि घरातील भांडी पडली. स्फोटाच्या आवाजाने गावकर्‍यांनी बाटलीची वाडीकडे धाव घेतली असता आगीच्या लोळात ट्रक भस्मस्थानी पडला होता. गावकर्‍यांनी स्थानिक पोलिसांना आणि अग्निशमन दलाला माहिती कळवली. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 8 गाड्या रवाना झाल्या होत्या. तसंच तहसीलदार,पोलीस पाटील घटनास्थळी पोहचले आहे.

Follow @ibnlokmattv

First published: November 24, 2014, 11:33 PM IST

ताज्या बातम्या