24 नोव्हेंबर : आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी सुप्रीम कोर्टाने बीसीसीआयला खडे बोल सुनावले आहेत. मुदगल समितीच्या अहवालात अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत आहे.
बीसीसीआयने क्रिकेटचा मान राखावा आणि क्रिकेट हे क्रिकेटच्याच स्पिरीटमध्ये खेळावे असं सुप्रीम कोर्टाने सुनावलंय. त्याचबरोबर बोर्डाचे अध्यक्ष हे आयपीएलमध्ये टीम विकत कसे घेऊ शकतात आणि या प्रकारात एन.श्रीनिवासन यांचे हितसंबंध गुंतले नाहीत का असा सवालही कोर्टाने बीसीसीआयला विचारला आहे.
जर बीसीसीआयने हा प्रकार असाच सुरू ठेवला तर क्रिकेटचा खून होईल असंही सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. इतकंच नाही तर आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात प्रथमदर्शनी ज्या अधिकार्यांची नावं समोर येतायत त्यांच्यावरही बोर्ड काहीही कारवाई करत नाहीये यावरुन सुप्रीम कोर्टाने बीसीसीआयवर ताशेरे ओढले आहेत. त्यामुळे आता सगळ्यांचं लक्ष सुप्रीम कोर्टाच्या अंतिम निकालाकडे लागलंय.
Follow @ibnlokmattv |