वडाळा बलात्कार प्रकरण : पीडित मुलीच्या प्रकृतीत सुधारणा

  • Share this:

rape-victims-

23 नोव्हेंबर : मुंबईतील वडाळा येथील 9 वर्षाच्या बलात्कार पीडित मुलीच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे.  या प्रकरणी आतापर्यंत 2 संशयीतांना अटक करण्यात आली आहे. तर 140 जणांची डीएनए टेस्ट घेण्यात आली आहे.

महिनाभरापूर्वी वडाळातील नऊ वर्षाच्या छकुलीवर पाशवी बलात्कार करण्यात आला होता. तिच्या गुप्तांगाला आणि अंतर्गत अवयवांना गंभीर जखमा झाल्या. सध्या छकुलीवर सायन हॉस्पिटलच्या विशेष वॉर्डामध्ये उपचार सुरू आहेत. पण सायन हॉस्पिटलमध्ये तिच्याकडे दुर्लक्ष झालं, असं तिच्या वडिलांचं म्हणणं आहे. त्यामुळे तिची प्रकृती गंभीर होती. पण बातमी दाखवल्यानंतर आता तिला योग्य उपचार मिळत असून तिच्या सुरक्षेसाठी महिला पोलीस तैनात करण्यात आले आहेत. तर तपासासाठी विशेष पथकाची स्थापना केली गेली आहे. उपचारांमध्ये हलगर्जीपणा झाला असेल तर संबंधितांवर कारवाई करण्याचं आश्वासनंही राज्य सरकारनं दिलं आहे.

दरम्यान, शिवसेना प्रवक्त्या आणि आमदार नीलम गोर्‍हे यांनी या मुलीची भेट घेतली. या मुलीच्या उपचारादरम्यान जो हलगर्जीपणा झाला, त्याची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी गोर्‍हेंनी केली आहे. याशिवाय महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे आज या पीडीत मुलीला भेट देण्याची शक्यता आहे.

Follow @ibnlokmattv

First published: November 23, 2014, 4:23 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading