वडाळा बलात्कार प्रकरणी अखेर दोघे संशयित अटकेत

  • Share this:

latur rape22 नोव्हेंबर : मुंबईत वडाळा इथं 28 दिवसांपूर्वी 9 वर्षांच्या छकुलीवर झालेल्या बलात्कार प्रकरणी आज अखेरीस 2 संशयितांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी एका नराधमाचं रेखाचित्र जारी करण्यात आलं होतं. तर 140 जणांची डीएनए टेस्ट घेण्यात आली आहे.

'वेदना छकुलीची...' या शीर्षकाखाली आयबीएन लोकमतने शुक्रवारी बातमी दाखवल्यानंतर तासाभरातच 9 वर्षांच्या या छकुलीला सायन हॉस्पिटलच्या विशेष वॉर्डात हलवण्यात आलं. 28 दिवसांपूर्वी छकुलीवर पाशवी बलात्कार करण्यात आला होता. त्यात तिच्या गुप्तांगाला आणि अंतर्गत अवयवांना गंभीर जखमा झाल्या. पण सुमारे महिनाभर सायन हॉस्पिटलमध्ये तिच्याकडे दुर्लक्ष झालं, असं तिच्या वडिलांचं म्हणणं आहे. त्यामुळे तिची प्रकृती गंभीर होती. पण बातमी दाखवल्यानंतर आता तिला योग्य उपचार मिळत असून तिच्या सुरक्षेसाठी महिला पोलीस तैनात करण्यात आले आहेत. तर तपासासाठी विशेष पथकाची स्थापना केली गेलीये. उपचारांमध्ये हलगर्जीपणा झाला असेल तर संबंधितांवर कारवाई करण्याचं आश्वासनंही राज्य सरकारनं दिलंय.

दरम्यान, आयबीएन लोकमतच्या बातमीनंतर प्रशासनाला जाग आली आणि त्यानंतर या छकुलीची चौकशी करण्यासाठी अनेक नेत्यांची सायन हॉस्पिटलमध्ये रिघ लागली. महिला बालकल्याण राज्यमंत्री विद्या ठाकूर, महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष सुशीबेन शहा, विरोधी पक्षनेते एकनाथ शिंदे, मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर, रिपाइंचे खासदार रामदास आठवले, भाजप आमदार मनिषा चौधरी, काँग्रेसचे आमदार भाई जगताप, खासदार राहुल शेवाळे, शिवसेनेचे नेते यशोधर फणसे, शिवसेना आमदार सदा सरवणकर यांनी सायन हॉस्पिटलमध्ये जाऊन तिची विचारपूस केली. शिवसेनेने या छकुलीला 50 हजार रुपये तर रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी 25 हजार रुपयांची मदत जाहीर केलीये.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 22, 2014 09:12 PM IST

ताज्या बातम्या