News18 Lokmat

लासलगाव मार्केट बंदच

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Nov 22, 2014 12:21 AM IST

444onion_nasik22 नोव्हेंबर : नविन व्यापारी लिलावात सहभागी झाल्यानं लासलगाव व्यापार्‍यांनी सोमवारपासून बंद पुकारला आहे. त्यामुळे मार्केट बंद असण्याचा आज सहावा दिवस आहे. याबाबत सहकार निवंधकांपासुन ते राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांपर्यंत भरपूर बैठका झाल्या मात्र अद्यापपर्यंत यावर कोणताही तोडगा निघालेला नाहीय.

  बाजाराला वेठीस धरल्याबद्दल बाजार समितीने 125 व्यापार्‍यांना नोटीसा बजावल्या आहेत. व्यापार्‍यांच्या आडमुठ्या धोरणामुळे शेतकर्‍यांचे नुकसानं होत असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आंदोलनाचा इशारा दिलाय. दरम्यान, हे मार्केट सोमवारी सुरू होईल, असं या समिताचे सभापती नानासाहेब पाटील यांनी सांगितलंय. लासलगाव प्रश्नी पणन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी हस्तक्षेप करावा, अशी मागणी शिवसेनेनं केलीय.

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 22, 2014 09:19 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...