पाथर्डीत अडीच लाखांची लाच घेताना पोलीस निरीक्षकाला अटक

पाथर्डीत अडीच लाखांची लाच घेताना पोलीस निरीक्षकाला अटक

  • Share this:

mhapolice21 नोव्हेंबर : पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणार्‍या पाथर्डी जवखेड हत्याकांड प्रकरणी अजूनही आरोपींना अटक करण्यात पोलिसांना अपयश आलंय. पण याच प्रकरणात तपास करणारे पाथर्डीचे पोलीस निरीक्षक सुभाष अनमोलवार यांना अडीच लाखांची लाच घेताना अटक करण्यात आलीये.

अडीच लाखांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अनमोलवार यांना रंगेहात पकडलंय. पंचायत समितीच्या सभापती निवडणुकीच्या वेळी विष्णूपंत अकोलकर, पत्नी उषा अकोलकर आणि मुलगा तसंच ड्रायव्हरविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.

या प्रकरणी विष्णूपंत अकोलकर यांना हायकोर्टाने जामीन नाकारला. त्यात त्यांना अटक करू नये म्हणून अनमोलवार यांनी लाच मागितल्याचं कळतंय.

Follow @ibnlokmattv

First published: November 21, 2014, 7:59 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading