राहुरी साखर कारखान्याचे चेअरमन तनपुरेंची महिलांना शिवीगाळ

राहुरी साखर कारखान्याचे चेअरमन तनपुरेंची महिलांना शिवीगाळ

  • Share this:

rahuri_tanpure21 नोव्हेंबर : राहुरी साखर कारखान्याच्या आवारात आज (शुक्रवारी) महिला कामगारांच्या संतापाच्या उद्रेकाचं आणि चेअरमन प्रसाद तनपुरेंच्या मुजोरीचं दर्शन घडलं. 42 महिन्यांपासून थकीत पगाराबद्दल विचारणा करण्यासाठी गेलेल्या महिलांना चेअरमन प्रसाद तनपुरे यांनी शिवीगाळ केलीय. यामुळे संतप्त महिलांनी तनपुरेंना अटक करा अशी मागणी केलीय.

अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी साखर कारखान्यांच्या महिला कामगारांना गेल्या 42 महिन्यांपासून पगार मिळत नसल्याने अनेक महिलांवर उपासमारी करण्याची वेळ आलीये. या महिलांनी आता घरखर्च भागवण्यासाठी दुसर्‍यांच्या शेतावर रोजानं काम करावं लागत आहे.या महिलांची व्यथा आयबीएन लोकमतने मांडल्यानंतर कारखान्याचे चेअरमन प्रसाद तनपुरे चांगलेच भडकले. त्यामुळे संतापलेल्या तनपुरेंनी या महिलांनाच अपशब्द वापरून त्यांचा अपमान केला. मेकअप करून शेतावर कामाला जात नाहीत, महिला काय काम करतात, त्यांचे काय धंदे आहेत असे शब्द तनपुरे यांनी या महिलांबद्दल वापरले. त्यामुळे संतापलेल्या महिला आणि कामगार यांनी तनपुरे यांच्या ऑफिसला घेराव घातला. तनपुरे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी अशी मागणी या कामगारांनी केलीये. तनपुरे यांच्यावर गुन्हा दाखल न

केल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशाराही या कामगार आणि महिलांनी दिला.

Follow @ibnlokmattv

First published: November 21, 2014, 4:24 PM IST

ताज्या बातम्या