कोल्हापुरात उचगाव टोलनाका पेटवला

कोल्हापुरात उचगाव टोलनाका पेटवला

  • Share this:

Toll naka

21 नोव्हेंबर : कोल्हापूरमध्ये टोलविरोधी आंदोलन पुन्हा भडकण्याची शक्यता आहे. संतप्त जमावाने काल (गुरूवारी)रात्री उचगाव टोलनाका नागरिकांनी पेटवून दिला आहे. त्यानंतर कोल्हापुरामध्ये सध्या तणावपूर्ण शांतता असून शहरातल्या सर्व टोलनाक्यांवर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

कोल्हापूर शहरातल्या उचगाव टोलनाक्यावर महिलांची एक गाडी जात असतानाच, आयआरबीच्या कर्मचार्‍यांनी या महिलांना दमदाटी करत शिवीगाळ केल्याचा आंदोलनकर्त्यांनी अरोप केला. त्यानंतर संतप्त जमावानं उचगावचा टोलनाका पेटवून दिला. त्यामुळे उचगाव टोलनाक्यावरचं वातावरण काही काळ तणावपूर्ण झालं होतं. या प्रकारानंतर मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

त्यापूर्वी टोलविरोधी कृती समितीनं कळंबा टोलनाक्यावर ठिय्या आंदोलन करत आयआरबीच्या कर्मचार्‍यांना पळवून लावलं होतं. पण त्यानंतरही कोल्हापूर शहरातल्या टोलनाक्यांवर कर्मचार्‍यांकडून टोलवसुलीसाठी सक्ती केली जात आहे. त्यामुळे या जमावाने हा टोल नाका पेटवून दिला आहे. उचगाव टोलनाका परिसरात काल (गुरूवारी) रात्री तणाव होता मात्र आता वातावरण शांत आहे.

खबरदारी म्हणून कोल्हापूर शहरातल्या सगळ्याच टोलनाक्यांवर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, अजूनही नवीन राज्य सरकारने कोल्हापूरच्या वादग्रस्त टोलबाबात कोणताही निर्णय न घेतल्यानं आता टोलविरोधातलं आंदोलन पुन्हा एकदा पेटण्याची चिन्हं आहेत.

 

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 21, 2014 09:26 AM IST

ताज्या बातम्या