जवखेड हत्याकांडाला महिना पूर्ण, आरोपी मोकाटच

जवखेड हत्याकांडाला महिना पूर्ण, आरोपी मोकाटच

  • Share this:

pathardi dalit murder case20 नोव्हेंबर : अहमदनगरमधील जवखेड गावात झालेल्या तिहेरी हत्याकांडाला 1 महिना पूर्ण झालाय. याविरोधात अनेक निदर्शनं झाली, पण आरोपी मात्र मोकाटच आहेत. एवढेच नाहीतर या प्रकरणात कोणताही पुरावा पोलिसांच्या हाती लागलेला नाही. या प्रकरणी तपास करण्यासाठी स्पेशल टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली होती. पण तरीही तपासात फारशी प्रगती झाली नाही.

20 ऑक्टोबर रोजी पाथर्डी तालुक्यातील जवखेडे इथं संजय जाधव, जयश्री जाधव आणि सुनील जाधव या तिघांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. तिघांच्या मृतदेहाचे तुकडे करून शेतातील विहीर आणि बोअरिंगमध्ये फेकून देण्यात आली होती. तब्बल तीन दिवस मृतदेहांच्या अवयवांचा शोध सुरू होता. त्यानंतर त्यांच्यावर अंत्यासंस्कार करण्यात आले. दलित संघटनांनी राज्यभर आंदोलनं, निदर्शनं सुरू आहे.पण महिना उलटूनही या प्रकरणातील आरोप पकडण्यात पोलिसांना यश आलं नाही. या प्रकरणी ऍट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर आरोपी पकडल्यानंतर या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालणार असल्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे.

जवखेड हत्याकांड घटनाक्रम

20 ऑक्टो. - तिहेरी खून

21 ऑक्टो. - एफआयआर दाखल

22 ऑक्टो. - पोस्टमॉर्टेम रिपोर्ट

23 ऑक्टो. - दलित अत्याचारविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

24 ऑक्टो. - संशयितांचे जबाब सुरू

25 ऑक्टो. - जोगेंद्र कवाडेंची भेट

26 ऑक्टो. - पाथर्डी बंद, प्रकाश आंबेडकर यांची भेट

27 ऑक्टो. - आरपीआयचा मोर्चा आणि अजित पवारांची भेट

28 ऑक्टो. - 100 संशयितांची चौकशी

1 नोव्हें. - राज ठाकरे, भालचंद्र मुणगेकरांनी दिली भेट

2 नोव्हें. - पंकजा मुंडे यांनी नार्को टेस्टची घोषणा केली

3 नोव्हें. - नाशिकमध्ये सर्वपक्षीय मोर्चा

4 नोव्हें. - 250 जणांचे जबाब पूर्ण, सुगावा मात्र नाही

7 नोव्हें. - मधुकर पिचड यांची भेट

8 नोव्हें. - साक्षीदारांच्या नार्को टेस्टसाठी कोर्टाकडे परवानगी अर्ज

10 नोव्हें. - साक्षीदारांच्या नार्कोला कोर्टाची परवानगी

10 नोव्हें. - विद्या चव्हाण यांचे धरणे

11 नोव्हें. - अण्णा हजारे यांची भेट

15 नोव्हें. - MIM नेते ओवेसी यांची भेट

Follow @ibnlokmattv

First published: November 20, 2014, 7:42 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading