लवकरच कॉलेजमध्ये पुन्हा निवडणुकीची रणधुमाळी

लवकरच कॉलेजमध्ये पुन्हा निवडणुकीची रणधुमाळी

  • Share this:

college_election20 नोव्हेंबर :पुन्हा एकदा महाविद्यालयांमध्ये निवडणुकाचे वारे वाहणार आहे. पुढच्या वर्षापासून महाविद्यालयामध्ये निवडणुका घेण्याच्या दृष्टीने तयारी सुरू आहे, अशी माहिती उच्चतंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिलीये.

गेल्या अनेक वर्षांपासून महाविद्यालयांमध्ये होणार्‍या निवडणुकांचा प्रश्न प्रलबिंत होता. महाविद्यालयीन निवडणुकांमध्ये एका तरुणाची हत्या झाल्यामुळे निवडणुकांवर बंदी घालण्यात आली होती. मात्र, युजीसीने महाविद्यालयात निवडणुका घेण्याचा निर्णय राज्य सरकारवर सोपवला होता. तत्कालीन आघाडी सरकारने महाविद्यालयात निवडणुकी घेण्याची तयारी दर्शवली होती. पण निर्णय काही झाला नाही. आता नव्या सरकारने पुन्हा एकदा निवडणुका घेण्याचा निर्णय घेतलाय. पुढच्या वर्षापासून महाविद्यालयामध्ये निवडणुका घेण्याच्या दृष्टीने तयारी सुरू आहे. त्याबद्दल सर्व महाविद्यालय, प्राचार्य, संघटनांशी बोलणी सुरू आहे. काही विपरीत घडू नये याचाही चाचपणी सुरू आहे असं उच्च तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट केलं. तसंच शालेय शिक्षणापासून ते कॉलेजेसपर्यंतच्या अभ्यासक्रमात बदल करण्याच्या दृष्टीने सरकार विचार करत असल्याचंही विनोद तावडे म्हणाले आहे. शाळांमधल्या लैंगिक अत्याचाराला आळा घालण्यासाठी योग्य ती काळजी घेण्याच्या सूचना देणार महाविद्यालयाच्या प्रशासनाला देणार असल्याचंही तावडेंनी स्पष्ट केलं.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 20, 2014 05:31 PM IST

ताज्या बातम्या