अब आयेंगे अच्छे दिन..., राज - उद्धव भेटीनंतर 'सामना'तून सूचक मथळा

अब आयेंगे अच्छे दिन..., राज - उद्धव भेटीनंतर 'सामना'तून सूचक मथळा

  • Share this:

SAMNA NEW

18   नोव्हेंबर :  शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना पेपरमध्ये उद्धवजी आणि राज स्मृतिस्थळावर एकत्र, अब आयेंगे अच्छे दिन अशा मथळ्याखाली बातमी छापण्यात आली आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेना आणि मनसेची युती व्हावी यासाठी शिवसेना अनुकूल असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या दुसर्‍या स्मृतिदिनानिमित्त उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आले होते.  तिथे राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली. याविषयी मंगळवारी सामनामध्ये 'अब अच्छे दिन आयेगे' या मथळ्याखाली बातमी छापण्यात आली आहे. यामध्ये शिवसेनेची ठोस भूमिका मांडण्यात आली नाही. मात्र या दोन्ही भावांच्या भेटीनंतर प्रसारमाध्यमं आणि कार्यकर्त्यांमध्ये उद्धव - राज यांच्या एकत्र येण्यावर चर्चा रंगल्याचे म्हटले आहे.

भाजपने यापुढे शिवसेनेकडे आशेने बघू नये असा इशारा उद्धव ठाकरे यांनी सामनामधून दिला होता. आता 'अच्छे दिन आयेगे' असे सांगत उद्धव ठाकरेंनी मनसेशी युती करण्याचे संकेत दिल्याची चर्चा रंगली आहे.

Follow @ibnlokmattv

First published: November 18, 2014, 10:33 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading